शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

महाबळेश्वरमध्ये सव्वाशे वर्षांतील विक्रमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाबळेश्वर हे पश्चिम महाराष्ट्रातील हिल स्टेशन म्हणून लोकप्रिय असण्याबरोबर पावसासाठी प्रसिद्ध आहे. यंदा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाबळेश्वर हे पश्चिम महाराष्ट्रातील हिल स्टेशन म्हणून लोकप्रिय असण्याबरोबर पावसासाठी प्रसिद्ध आहे. यंदा २२ व २३ जुलै रोजी एका दिवसात पडलेला पाऊस हा गेल्या सव्वाशे वर्षांतील विक्रमी पाऊस ठरला आहे.

२२ जुलै रोजी महाबळेश्वर येथे ४८० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याच्या दुुसऱ्या दिवशी २३ जुलै रोजी ५९० मिमी पावसाची नोंद झाली होती. यापूर्वी ७ जुलै १९७७ रोजी एकाच दिवशी ४३९.८ मिमी पावसाची विक्रमी नोंद होती. जुलै महिन्यातील २४ तासांत पडलेला हा आजवरचा विक्रमी पाऊस होता. यंदा २२ व २३ जुलै रोजी पडलेल्या पावसाने हा विक्रम मोडला आहे.

हवामान विभागाकडे १८९६ पासून पावसाच्या नोंदी आढळून येतात. त्यानुसार जुलै महिन्यात १८९६ मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी पाऊस ४८६६.९ मिमी पाऊस पडला होता. यंदा आतापर्यंत १ जूनपासून महाबळेश्वरमध्ये ४०३० मिमी पावसाची नोंद झाली असून यंदा जून मध्ये १२८९.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आतापर्यंत जुलै महिन्यात २८४१ मिमी पाऊस झाला आहे.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार महाबळेश्वरमध्ये जुलै महिन्यात सरासरी २०६४.४ मिमी पाऊस होतो. यंदा गेल्या १९ जुलैपासूनच केवळ ८ दिवसांत २१०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पश्चिमीकडील वार्यांचा जोर वाढला. त्यावेळी पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याचा परिणाम होऊन बाष्प घेऊन येणारे ढग महाबळेश्वरच्या डोंगररांगांना धडकून ते वर जात होते. एकाच जागी हे ढग तयार झाल्याने महाबळेश्वरला कमी वेळेत अधिक पाऊस झाला. महाबळेश्वरप्रमाणेच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अनेक ठिकाणी ही परिस्थिती होती. मात्र, त्याठिकाणी पडलेला पाऊस मोजला गेला नसल्याने त्याची नोंद होऊ शकली नाही. यामुळे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर, दरडी कोसळणे अशा घटना घडल्या.

गेल्या १० वर्षांत ३१ जुलै २०१४ रोजी २४ तासांत ४३२ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, १६ जुलै २०१८ रोजी २९८ .७ मिमी पावसाची नोंद झाली होती.

महाबळेश्वरमध्ये २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)

१९ जुलै - १००

२० जुलै - ११०

२१ जुलै - १६०

२२ जुलै - ४८०

२३ जुलै - ५९०

२४ जुलै - ३२०

२५ जुलै - १९०

२६ जुलै - १५०