पुणो : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुसाठी यंदा विक्रमी मतदान झाले आहे. महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या आतार्पयच्या निवडणुकीत इतके मतदान प्रथमच झाले आहे. एकूण 1क्74 मतदारांपैकी 1क्2क् मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. चौरंगी होत असलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे आज (दि. 1क्) दुपार्पयत स्पष्ट होणार आहे.
यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एप्रिलमध्ये घुमान येथे होत आहे. भारत सासणो, अशोक कामत, डॉ. सदानंद मोरे, पुरुषोत्तम नागपूरे हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अध्यक्षपदाच्या मतदानासाठीची प्रक्रिया मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाली. सोमवार दिवसअखेर निवडणूक अधिका:यांकडे 66क् मतपत्रिका दाखल झाल्या होत्या. मंगळवारी दिवसभरात 36क् मतपत्रिका दाखल झाल्या. अध्यक्षपदासाठी आतार्पयत झालेल्या निवडणुकीत या वर्षी विक्रमी मतदान झाले आहे. या पूर्वी इतक्या मोठय़ा संख्येने मतदान करण्यास साहित्यिकांनी उत्सुकता दाखविली नव्हती. मतदानाची टक्केवारी कमी असल्यानेही साहित्य क्षेत्र टिकेचे धनी ठरले होते.
विभागवार झालेले मतदान : मसाप 173, मुंबई 152, नागपूर 175, मराठवाडा 169, गोवा 47, हैद्राबाद 47, कर्नाटक 48, छत्तीसगड 46, मध्यप्रदेश 47, बडोदा 11 तसेच पूर्वाध्यक्ष 24 आणि स्वागत मंडळ 85 या प्रमाणो मतदान झाले.
मतदानपत्रिका दाखल करण्यासाठी सायंकाळी 7 वाजेर्पयत मुदत होती. ही वेळ संपल्यानंतर मतपेटी उमेदवार तसेच उमेदवार प्रतिनिधींच्या समक्ष सील करण्यात आल्याचे निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांनी सांगितले. या वेळी भारत सासणो तसेच रमेश मंत्री, चंद्रकांत भोंजाळ, अमित कुलकर्णी हे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मतदानाविषयी मतदारांमध्ये यंदा जागरुकता असल्याचे दिसून आले. विक्रमी मतदान झाले ही आनंदाची गोष्ट आहे. मतदान वाढल्याने स्पर्धाही तीव्र झाली आहे. सर्वच उमेदवारांनी प्रचारादरम्यान मतदरांर्पयत पोहोचण्याचा प्रय} केला. विविध माध्यमांचा प्रचारासाठी वापर केला. त्यामुळे मतदारांमध्ये जागरुकता निर्माण झाली असावी.
- भारत सासणो
यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान झाले आहे, ही चांगली गोष्ट आहे. सर्वाना मतपत्रिका मिळाल्याने मतदारांमध्येही उत्साह असावा. आता निकाल काय लागतो ते बघू.
- अशोक कामत