शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
2
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
3
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
4
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
5
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
6
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
8
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
9
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
10
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
11
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
12
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
13
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
14
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
15
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
16
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
17
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
18
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
19
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
20
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!

वसुली १२०७ कोटी

By admin | Published: April 02, 2017 3:08 AM

महापालिकेच्या मिळकत कर विभागाने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ हजार २०७ कोटी ७ लाख रुपयांची करवसुली केली. त्यातील २१० कोटी रुपये आॅनलाईन पद्धतीने जमा झाले आहेत.

पुणे : महापालिकेच्या मिळकत कर विभागाने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ हजार २०७ कोटी ७ लाख रुपयांची करवसुली केली. त्यातील २१० कोटी रुपये आॅनलाईन पद्धतीने जमा झाले आहेत. अखेरच्या दिवशी म्हणजे ३१ मार्चला विक्रमी म्हणजे ६७ कोटी रुपयांची वसुली झाली.प्रशासनाने दिलेले उद्दिष्ट मिळकत कर विभागाने ओलांडले असले, तरी स्थायी समितीने दिलेले १ हजार ४४४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट मात्र त्यांना पार करता आलेले नाही. मागील आर्थिक वर्षात (सन २०१५-१६) या विभागाने १ हजार १७९ कोटी रुपयांची वसुली केली होती. त्यापेक्षा जास्त वसुली या वेळी झाली आहे; मात्र स्थायी समितीच्या अंदाजापेक्षा ती कमी असल्याने अंदाजपत्रकात सुमारे २३७ कोटी रुपयांची घट आली आहे.महापालिकेच्या नोंदणीपात्र मिळकतधारकांची संख्या ८ लाख ४० हजार आहे. त्यांपैकी ७ लाख ९० हजार मिळकतधारकांनी आपला कर जमा केला आहे. त्यांपैकी २ लाख १५ हजार जणांनी महापालिकेला अपेक्षित असलेल्या आॅनलाईन पद्धतीने कर जमा केला आहे. या पद्धतीने महापालिकेकडे एकूण २१० कोटी रुपये जमा झाली. ही संख्या एकूण संख्येच्या साधारण ३५ टक्के आहे. मागील वर्षी ती अगदीच कमी होती. आॅनलाईन कर जमा करणाऱ्यांची संख्या वाढावी, यासाठी महापालिका प्रशासन अशा मिळकतदारांना करामध्ये ५ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, सर्वसाधारण सभेने हा प्रस्ताव मंजूर न करता लांबणीवर टाकला आहे.मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले, की ही सवलत रोख स्वरूपात नाही तर त्यांना त्यांच्या पुढील वर्षीच्या मिळकत करात कमी करून दिली जाईल. १५ क्षेत्रीय कार्यालयांत आॅनलाईन कर जमा करणाऱ्यांमध्ये प्रत्येकी ५ याप्रमाणे सोडत काढून एकूण १५० जणांना आॅनलाईन कर जमा केल्याचे पारितोषिक म्हणून करात ५ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव आहे. ही सवलतसुद्धा पुढील वर्षीच्या करामध्ये मिळेल. रोखीने व्यवहार करण्याऐवजी बँकेमार्फत व्हावे, असे केंद्र व राज्य सरकारचेही धोरण असून त्यानुसारच या योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे मापारी म्हणाले. (प्रतिनिधी)