शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

लालपरी रस्त्यावर... पण प्रवाशांची संख्या रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 2:18 AM

एसटी कर्मचा-यांचा संप आज मिटल्याने एसटी बससेवा आजपासून सुरळीत सुरू झाली; परंतु आता प्रवाशांनी मात्र एसटीकडे पाठ फिरवली असल्याचे जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून आले. आता एसटीला प्रतीक्षा प्रवाशांची आहे.

पुणे : एसटी कर्मचा-यांचा संप आज मिटल्याने एसटी बससेवा आजपासून सुरळीत सुरू झाली; परंतु आता प्रवाशांनी मात्र एसटीकडे पाठ फिरवली असल्याचे जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून आले. आता एसटीला प्रतीक्षा प्रवाशांची आहे.शिरूर : ऐन दिवाळीत संपावर गेलेल्या एसटी महामंडळाचे कर्मचारी आज कामावर रुजू झाले. मात्र, प्रवाशांनी संपाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या पर्यायी व्यवस्थेमुळे आज शिरूर बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी कमी जाणवली. दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी याच स्थानकावर उभे राहायला जागा नसते. एसटी बसेसही प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दिसतात. आज मात्र ती परिस्थिती जाणवली नाही.न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांना संप मागे घ्यावा लागला. सोशल मीडियावर ही वार्ता वाºयासारखी पसरली. आज सकाळी सर्वसामान्यांची लाल-पिवळी एसटी बस स्थानकात फलाटावर लागण्यास सुरुवात झाली. हताश झालेल्या चेहºयांनी वाहक-चालकांना कामावर रूजू व्हावे लागले. मात्र, आज सकाळपासूनची परिस्थिती पाहता दरवर्षी भाऊबीजेला प्रवाशांनी खचाखच भरलेले शिरूर बसस्थानिक बºयापैकी मोकळे जाणवले. दुपारनंतर यात थोडी वाढ होत गेली.तरीही दरवर्षी दिसून येणारी प्रवाशांची झुंबड यावर्षी जाणवली नाही. एसटी बसेस मात्र दररोजच्या वेळापत्रकानुसार फलाटावरलागत होत्या. भाऊबीजेच्या दिवशी पुण्याला जाणाºया बसेसमध्येउभे राहायला जागा मिळणे देखील कठीण जाते. आज मात्रबसेस नेहमीप्रमाणे भरलेल्या दिसत होत्या. अनेक बसेसमध्येउभा राहिलेला प्रवाशीच आढळला नाही.>घोडेगावला शुकशुकाटघोडेगाव : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर ग्रामीण भागात एसटी धावली. चार दिवस शुकशुकाट असलेल्या घोडेगावच्या बसस्थानकात भाऊबीजेच्या दिवशी गजबज दिसून आली. एसटी येत होत्या व भरून भरून जात होत्या.एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे दिवाळीत ग्रामीण भागातील लोकांचे हाल झाले. पूर्णत: एसटीवर अवलंबून असलेल्या लोकांनी गावातून बाहेर पडणे टाळले. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात अजूनही एसटीशिवाय पर्याय नाही.एसटीच्या संपामुळे अनेक लोक गावातच थांबून राहिले होते. भाऊबीजेला संप मिटावा, अशी सर्वांची अपेक्षा होती, त्याप्रमाणे आदल्या दिवशी रात्रीच संप मिटला व एसटी गाड्या भाऊबीजेला रस्त्यावरून धावू लागल्या.भाऊबीजेच्या दिवशी घोडेगाव बसस्थानकात गर्र्दी दिसली. बाहेरगावी जाण्यासाठी अनेक प्रवासी एसटीची वाट पाहत होते. येणारी प्रत्येक गाडी भरून जात होती. एसटीचा संप मिटल्याचा अनेकांनी आनंद व्यक्त केला. बारामती : एसटी कर्मचाºयांचा संप चौथ्या दिवशी मिटला असला तरी बसस्थानकांवरील प्रवाशी संख्या मात्र रोडावली आहे. भाऊबीजच्या दिवशी एसटी प्रशासनावर अतिरिक्त प्रवाशी संख्येचा ताण असतो. मात्र संप मिटल्याचे अनेकांना ठाऊक नसल्याने अनेक बसगाड्या अवघ्या चार-पाच प्रवाशांना घेऊनच धावत असल्याचे चित्र बारामती बसस्थानकात दिसत होते.आज सकाळपासुन एसटी सेवा पुर्ववत झाली.मात्र, याबाबत अनेकांना माहिती नव्हती.त्यामुळे दिवाळी,भाउबीज सणाच्या तुलनेने गर्दीचे प्रमाण आज एसटीबसमध्ये प्रवाशांचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसुन आले.एसटी संप सुरुच असल्याच्या भावनेतुन अनेकांनी बाहेर गावी प्रवासाला जाणे टाळले.तर काहींनी एसटी बसला रेल्वे प्रवासाचा पर्याय निवडला.दरम्यान,२४ दररोज ३१० फेºया होणारा बारामती आगाराच्या शनिवारी (दि. २१) २५९ फेºया झाल्या. संपामुळे रात्री मुक्कामी थांबणाºया बस गेल्या नसल्याने फेºयांची संख्या कमी झाल्या आहेत. पुढील २४ तासात परिस्थिती पूर्ववत होईल, असे बारामती आगारचे प्रमुख नंदकुमार धुमाळ यांनी सांगितले.