लाखेवाडी : काटी, वडापुरी इंदापूरकडे जाणाऱ्या रस्त्याला काटेरी झुडपांनी वेढा घातला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या गुरांच्या शेणखताचे ढिगारे, रस्त्यालगत गुरे बांधणे आणि साईट पट्यावरती धनदांडग्या शेतकऱ्यांच्या अतिक्रमणामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.
रस्त्याच्या दोन्ही साईटला काटेरी झुडपांनी विळखा घातल्यामुळे समोरून फोर व्हीलर, टू व्हीलर गाडीवरती येणाऱ्या नागरिकांना व जाणाऱ्या नागरिकांना गाडी दिसत नसल्यामुळे अपघात होऊ शकतो. रेडा ते वडापुरी रस्त्यालगत काटेरी झुडपे, नागरिकांच्या गुरांच्या खाताचे ढिगारे, शेतकऱ्यांनी साईटपट्यावरती केलेल्या अतिक्रमणामुळे व काटेरी झुडपामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना साईटपट्टीवरती वाहन घेता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा अपघात झालेत. बोराटवाडी, खोरोची, चाकाटी, पिठेवाडी, नीरा भीमा कारखाना, रेडा , अशा अनेक गावाचा इंदापूरकडे जाण्यासाठी अतिमहत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावरील तात्काळ काटेरी झुडपे काढून रस्त्यालगत केलेली अतिक्रमणे काढावीत अशी मागणी जोर धरु लागली आहे.
रेडा- वडापुरी रस्त्याला काटेरी झुडपांचा पडलेला विळखा
१२१२२०२०-बारामती-१४