शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

लठ्ठपणा कमी करायचा आहे? मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 5:45 PM

लठ्ठपणाचे मी एक उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी ‘हे चित्र बदलण्यासाठी लहानवयातच मुलांमध्ये संस्कार रुजविण्याबरोबच लठ्ठपणाविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यांच्या जीवनशैलीत बदल करायला हवा’, असा कानमंत्र दिला.

ठळक मुद्देमुलांमध्ये संस्कार रुजविण्याबरोबच लठ्ठपणाविषयी प्रबोधन करणे आवश्यक : देवेंद्र फडणवीस‘लहान मुलांमधील लठ्ठपणाशी लढा’ मोहिमेचे उद्घाटन

पुणे : आपल्या जीवन आणि जीवनशैलीत परिवर्तन झाले आहे. तसेच सुखासीनपणा आल्याने लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी चिंता व्यक्त केली. लठ्ठपणाचे मी एक उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी ‘हे चित्र बदलण्यासाठी लहानवयातच मुलांमध्ये संस्कार रुजविण्याबरोबच लठ्ठपणाविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यांच्या जीवनशैलीत बदल करायला हवा’, असा कानमंत्रही दिला.रोटरी क्लब आॅफ कोरेगाव पार्क आणि जेटी फाऊंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘लहान मुलांमधील लठ्ठपणाशी लढा’ या मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला खासदार अनिल शिरोळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मोहिमेच्या निमंत्रक आणि तोडकर क्लिनिक व जेटी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. जयश्री तोडकर, रोटरीचे जिल्हा प्रांतपाल अभय गाडगीळ, क्लबचे अध्यक्ष संदेश गुप्ता, नवनीत गाला आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहिमेचा लोगो व बीएमआय डायलरचे अनावरण करण्यात आले.पुढील काळात देश घडविण्याची जबाबदारी असलेली पिढी नकळतपणे अक्षमतेकडे जात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. लठ्ठपणाबरोबरच त्यानंतर येणारे रोगही वाढत आहेत. जीवनशैली व जेवणशैली बदलली असून आता सुखासीनपणा आला आहे. मागील ४० वर्षांमध्ये आपल्या पारंपरिक शैलीत खुप बदल झाला आहे. शरीरासाठी आवश्यक पोषण आहाराचा समतोल बिघडला असून लहान मुले त्याला बळी पडत आहेत. लहान मुलांमधील मैदानी खेळाचे प्रमाण कमी झाले आहे. संगणकावरही मैदानी खेळ आल्याने तेच खेळले जात आहेत, ही शोकांतिका आहे. लठ्ठपणाचे मी एक उदाहरण आहे. त्यावेळी लठ्ठपणाविषयी अशा कोणत्याही मोहिमा नव्हत्या. आहारविषयी फारशी जागृती नव्हती. आता हे सगळे उपलब्ध होत आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना त्यांच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट, हे सांगण्याची गरज आहे. शाळांनी मुलांमध्ये संस्कार रुजविण्याबरोबरच त्यांना लठ्ठपणाविषयी सांगणेही आवश्यक आहे. लठ्ठपणा हा सर्व रोगांची जननी आहे. त्यासाठी राज्यात कृती दलही स्थापन करण्यात आले आहे. आज पुण्यात सुरू झालेली मोहीम राज्यभर राबविण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमुद केले. मोहिमेची सुरूवात पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांपासून केली जाणार असल्याची माहिती डॉ. तोडकर यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र