शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

समुपदेशन, जनजागृती अन् औषधांमुळे शहरातील एड्सग्रस्तांची घटली संख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 1:32 PM

आजाराची बाधा होणाऱ्यांमध्ये पुरुषांसोबतच महिलांची संख्या लक्षणीय

ठळक मुद्देपालिकेकडून जनजागृती : एड्स दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजनहा आजार होण्यामध्ये कामगार, वेठबिगार, बांधकाम कामगार, चालक गटांतील नागरिकांचे सर्वाधिक प्रमाण २०१६ च्या तुलनेत २०१९ पर्यंत एड्सग्रस्त रुग्णांची संख्या घटली

पुणे : जनजागृती, समुपदेशन आणि औषधांच्या नियमित सेवनामुळे महापालिका हद्दीतील एड्सग्रस्त रुग्णांची संख्या घटली आहे. २०१६ च्या तुलनेत २०१९ पर्यंत एड्सग्रस्त रुग्णांची संख्या घटली आहे. आजाराची बाधा होणाऱ्यांमध्ये पुरुषांसोबतच महिलांची संख्या लक्षणीय आहे. जनजागृती, समुदेशन आणि वारंवार केली जाणारी रक्तचाचणी यामधून बाधितांची संख्या कमी होण्यास मदत मिळाल्याचे वैद्यकीय अधिकारी तथा समन्वय अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.हा आजार होण्यामध्ये सर्वाधिक प्रमाण अल्प उत्पन्न गटातील तसेच कामगार, वेठबिगार, बांधकाम कामगार, चालक अशा गटांतील नागरिकांचे आहे. पालिकेकडून ‘हाय रिस्क’ गटातील लोकांची वारंवार एचआयव्ही तपासणी, रक्त तपासणी केली जाते. यासोबतच त्यांचे समुपदेशनही करण्यात येते. पालिकेकडून दर ६ महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने एड्सविषयक जनजागृतीकरिता समुपदेशकांची नियुक्ती केली जाते. देहविक्रय करणाºया स्त्रियांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, या स्त्रियाच अधिक जागरूक असल्याचे आणि असुरक्षित लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यापासून परावृत्त झाल्याचे पालिकेच्या पाहणीमधून समोर आले आहे. तपासणी केल्यानंतर जर रोगनिदान झालेच, तर तातडीने उपचार सुरू केले जातात. रुग्णांची नियमित तपासणी केली जाते. गर्भवती स्त्रिया, अतिदक्षता विभागातील रुग्ण, रक्तपेढीमध्ये गोळा होणारे रक्त, शस्त्रक्रियेसाठी आलेले रुग्ण, डॉक्टर आणि सहकारी अशा घटकांचीही तपासणी करण्यात येते. .......१ डिसेंबरपासून विविध कार्यक्रम : मॅरेथॉन, सायकल रॅली अन् पथनाट्यपालिकेकडून १ डिसेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४सायकल रॅली, मॅरेथॉन, डिस्प्ले व्हॅनद्वारे जागृती, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शन, गटचर्चा, विद्यार्थ्यांसाठी जनजागृती, निबंध,पोस्टर्स व भाषण स्पर्धा, वेश्यावस्तीतील महिलांसाठी मेळावा, युवक-युवती मेळावा अशा कार्यक्रमांचे आयोजन क रण्यात आल्याचे डॉ. देवकर यांनी सांगितले. .........एड्सबाधितांची आकडेवारी    2016    2017    2018    2019 पुरुष    974    740    873    748महिला    751    569    689    558मुले    26    21    04    12मुली    15    17    08    06तृतीयपंथी    02    08    13    10गर्भवती    60    08    46    43खासगी रुग्णालये    —    —    73    129..........वर्ष    प्रकार    पुरुष    महिला    मुले     मुली    तृतीयपंथी    गर्भवती    एकूण2016    समुपदेशन     35, 132    24, 528    616    204    204    32, 342    93, 316    रक्तचाचणी    30, 390    24, 370    616    504    204    31, 389    87, 9232017    समुपदेशन    36, 327    21, 016    700    573    142    30,843    89,601    रक्तचाचणी    30, 924    20, 801    698    569    129    29, 652    82, 7732018    समुपदेशन    40, 992    24, 467    995    486    21    31, 640    98, 601    रक्तचाचणी    35,339    24,082    962    464    21    30,450    91, 3182019    समुपदेश    35,512    19,897    656    422    114    25,982    82,583    रक्तचाचणी    33,808    19,318    645    416    113    25,282    79,384....

टॅग्स :PuneपुणेHIV-AIDSएड्सPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल