शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

कासवगतीने होतेय पेट्रोल-डिझेलच्या भावात घट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 9:46 PM

गेल्या काही महिन्यांपासून अपवाद वगळता दररोज इंधनाच्या दरात वाढ केली जात आहे.

पुणे : गेल्या महिन्यात दररोज सरासरी वीस ते तीस पैशांनी वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या भावात घट मात्र १ ते ९ पैशांदरम्यान केली जात आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढविताना मीटर धावत असून घट करताना मात्र त्याची गती निम्मी देखील नसल्याचे चित्र आहे.  गेल्या काही महिन्यांपासून अपवाद वगळता दररोज इंधनाच्या दरात वाढ केली जात आहे. शहरात एक मे रोजी पेट्रोलचा प्रतिलिटर भाव ८२.३३, डिझेल ६९ आणि पॉवर पेट्रोलचा भाव ८५.१० रुपये प्रतिलिटर इतका होता. कर्नाटक राज्याच्या निवडणुकीमुळे मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात जवळपास १५ दिवस पेट्रोल-डिझेलची भाववाढ करण्यात आली नव्हती. त्यानंतर मात्र, २९ मे पर्यंत पेट्रोल-डिझेलच्या भावात सातत्याने वाढ नोंदविण्यात आली. शहरात २९ मे रोजी पेट्रोल ८६.०७, डिझेल ७२.५१ आणि पॉवर पेट्रोलचे भाव ८८.८३ रुपये इतके होते. म्हणजेच मे महिन्यातच पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ३.७४, डिझेल ३.५१ आणि पॉवर पेट्रोल ३.७३ रुपयांनी वाढले. केवळ १५ ते १६ दिवसांतच ही भाववाढ नोंदविण्यात आली. त्यानंतर ३० मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात प्रतिलिटर १ पैशांनी घट करण्यात आली. तर, २ जून रोजी भावात प्रतिलिटरमागे ९ पैशांनी घट झाली. शनिवार अखेरीस पेट्रोलचा प्रतिलिटर भाव ८५.८४, डिझेल ७२.३० आणि पॉवर पेट्रोलचा भाव ८८.६० रुपये इतका होता. 

टॅग्स :PuneपुणेPetrolपेट्रोलDieselडिझेलMaharashtraमहाराष्ट्र