राजगुरुनगर शहरातून शिरूर-भीमाशंकर रस्ता जातो. या रस्त्यावर वाडारोड येथील संगम क्लासिक व हॉटेल धनराज या दरम्यान रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडून त्यामध्ये पावसाचे पाणी होते. या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. त्यात रस्त्यावरील खड्डे अधिक मोठे होत चालले होते आणि संख्याही वाढत होती. त्यामुळे रोजच किरकोळ अपघात वाढत होते. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, सोबत चास, वाडा, डेहणे पुढे भीमाशंकरला या रस्त्याचा जाण्यासाठी ह्या रस्त्याचा वापर होत असल्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते.
याबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त छापून खड्डे बुजविण्याची मागणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने या वृत्ताची दखल घेत वाडा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये मुरूम टाकण्याचे काम सुरू केले आहे. रस्ता तातडीने दुरुस्त करावा, याबाबतची मागणी सातकरस्थळचे माजी सरपंच अजय चव्हाण यांनीही केली आहे.