पुणे : माल व प्रवासी वाहनांना रिफ्लेक्टर्स, रिफ्लेक्टीव्ह टेव व रियर मार्किंग प्लेट बसविण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. रिफ्लेक्टर नसल्यास परिवहन विभागाकडून 1 ऑगस्टपासून कारवाई सुरु केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
केंद्रीय माेटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार माल व प्रवासी वाहतुक करणाऱअया वाहनांना रिफ्लेक्टर्स बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरु करण्यात आली हाेती. त्यानुसार रिफ्लेक्टर, टेप नसलेल्या वाहनांची नाेंदणी थांबविण्यात आली हाेती. तसेच वाहनांना याेग्यता प्रमाणपत्रही दिले जात नव्हते. पण वाहतुक संघटनांनी या निर्णयाला विराेध केला. या निर्णयाचे परिपत्रक 29 जून राेजी काढून लगेच 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरु करण्यात आली हाेती. त्यामुळे वाहन मालकांना रिफ्लेक्टर्ससाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याने नाेंदणी थांबल्याचा दावा संघटनांनी केला हाेता. त्यामुळे परिवहन विभागाने दाेन दिवसांतच या निर्णयाला स्थगिती दिली.