शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

ऊसवाहतूक गाड्यांना रिफ्लेक्टर बसवा

By admin | Published: February 05, 2016 2:20 AM

यमदूत बनलेल्या ऊस वाहतुकीच्या टॅ्रक्टर-टेलरला चाप लावण्यात कारखाने अपयशी झाले असले, तरी आता साखर आयुक्तांनीच याबाबत कारवाईचा बडगा उगारला

सोमेश्वरनगर : यमदूत बनलेल्या ऊस वाहतुकीच्या टॅ्रक्टर-टेलरला चाप लावण्यात कारखाने अपयशी झाले असले, तरी आता साखर आयुक्तांनीच याबाबत कारवाईचा बडगा उगारला आहे. ऊसवाहतूक करणाऱ्या गाड्यांना रिफ्लेक्टर लावण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने माहिती अधिकारात माहिती मागविली होती. त्यानंतर अर्जाची दखल घेत, त्यांनी राज्यातील कारखान्यांना प्रत्येक ट्रॅक्टर-टेलर, ट्रक व बैलगाड्यांना रिफ्लेक्टर व रिफ्लेक्टिव टेप बसविण्याचे परिपत्रक काढून आदेश दिले आहेत. राज्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यानंतर, साखर कारखाना कार्यक्षेत्रात उसाची वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-टेलर व बैलगाड्यांना रिफ्लेक्टर नसल्याकारणांनी परिसरातील नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागते. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. तसेच, याबाबत संबंधित कारखानेही कोणतीही कारवाई करत नसल्याचे दिसत आहे. कारखान्यांनी व प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित कारखान्यांवर कॅम्प घेऊन उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना रिफ्लेक्टर बसविण्याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे आणि जे वाहनचालक रिफ्लेक्टर बसविण्याबाबत टाळाटाळ करतात, अशा वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)साखर कारखान्यांच्या परिसरात रात्रीच्या वेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनांना उसाने भरलेल्या वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने अपघात होतात. यामध्ये अनेकांना आपला प्राणही गमवावा लागतो. याबाबत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने साखर आयुक्तांना पत्र पाठवित ही बाब निदर्शनास आणून देऊन, याबाबत आपण काय कारवाई केली, असे विचारले होते. यावर साखर संचालकांना प्रादेशिक सह संचालक यांना आदेश देऊन याबाबतचे परिपत्रकच काढले आहे. तसेच, प्रादेशिक सह संचालकांबरोबरच राज्यातील साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांनाही परिपत्रक पाठवून याबाबत तत्काळ अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.