आळंदी : मुलीच्या घरच्यांकडून सोळा लाख रुपयांचे २३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन ऐनवेळी लग्नास नकार देत मुलीची व तिच्या घरच्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वर मुलासह पाच जणांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार १८ एप्रिल ते १५ मे २०२३ या कालावधीत आळंदी येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून देविदत्त वसंत भारदे , डॉ. वसंत दत्तात्रय भारदे, दोन महिला आरोपी व अमित डहाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की फिर्यादी यांच्या घरी जात आरोपी देवीदत्त व त्याच्या घरच्यांनी लग्न जमवले. फिर्यादी व तिच्या घरच्यांच्या विश्वास संपादन करून मुलीला कर्जतला एका रिसॉर्ट नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पुढे फिर्यादीच्या घरच्यांकडून देवीदत्तच्या आईवडिलांनी हुंडा म्हणून १६ लाख रुपयांचे २३ ग्रॅम वनजनाचे दागिने बनवून घेतले. दरम्यान लग्नाची तारीख ठरली. फिर्यादीच्या घरच्यांना सागूंन लग्नाचा खर्च करायला सांगितला. मात्र ऐनवेळी आरोपींनी लग्नाला नकार दिला. यावरून पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप अटक नाही. आळंदी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.