बारामती : म्युकरमायकोसिस या घातक बुरशीजन्य रोगावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन्स लागतात. त्यामुळे लोकांना खूप मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. यासाठी राज्य सरकारने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यास खासगी रुग्णालयांनी नकार दिला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता पुढे येत आहे.
राज्य सरकारने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी महात्मा फुले योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सोय केल्याचे जाहीर केले आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे रुग्णांची खूप मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे. अनेक त्यामुळे राज्य सरकारची घोषणा केवळ कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले की काय? त्यामुळे जे खासगी हॉस्पिटल उपचार करण्यास नकार देतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दौंड तालुका निरीक्षक बापूराव सोलनकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या सामान्य लोकांना उपचारासाठी पैसे आणायचे तरी कुठून, असा प्रश्न पडला आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या घातक बुरशीजन्य रोगावर उपचार करण्यासाठी महागडी इंजेक्शन्स लागतात. या सगळ्याचा खर्च २० ते ३० लाखांच्या घरातही जाऊ शकतो. मात्र, आता मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांनी महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यास नकार दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार या रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.