पिंपरी : प्रशासनाने आकाशचिन्ह परवाना विभागाकडून जाहिरातफलक परवाना शुल्कात कोणतीही वाढ न सुचविणारा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता. यापूर्वी स्थायी समितीने विरोध केलेल्या एका प्रस्तावात मिळकतकराच्या माध्यमातून सामान्यांना करवाढ सुचवली होती, तर दुसऱ्या प्रस्तावात जाहिरात परवाना शुल्कात करवाढ करू नये, असे सुचवले होते. आकाशचिन्ह परवाना विभागाने पूर्वीचेच दर कायम ठेवण्याचा जो ठराव ठेवला होता, त्यास शिवसेनेच्या आशा शेंडगे यांनी विरोध केला. त्यामुळे हा ठराव तहकूब ठेवावा लागला. आकाशचिन्ह परवाना, जाहिरातकर व जागा भाडे आकारणीचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव समितीपुढे प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला होता. गतवर्षाप्रमाणेच २०१५-१६ या आर्थिक वर्षात दर कायम ठेवण्याचे त्यामध्ये प्रस्तावित केले असल्याने महापालिकेच्या उत्पन्नवाढीस खीळ घालणारा प्रस्ताव असल्याचे मत शेंडगे यांनी व्यक्त केले. एकीकडे मिळकतकरातील वाढीमुळे सामान्य करदात्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार असताना जाहिरात व्यावसायिकांना फायद्याचा ठरणारा प्रस्ताव ठेवला जातो, ही विसंगती त्यांनी निदर्शनास आणून दिली. (प्रतिनिधी)
पालिकेत सत्तारूढ पक्षनेत्यांचा संताप
By admin | Published: January 31, 2015 1:31 AM