तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत पॉलिटेक्निक, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान आणि थेट द्वितीय वर्ष तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. दहावी, बारावीच्या निकालानंतर पदविका प्रवेशाची माहिती विद्यार्थी व पालकांना माहिती होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन तंत्रशिक्षण विभागाने केले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, जिल्हा, इच्छुक अभ्यासक्रमाची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरावी. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर संबंधित अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होणार आहे, गुणवत्ता यादी, प्रत्यक्ष प्रवेशाची माहिती मोबाइल व ईमेल आयडीवरून पाठविणे शक्य होणार आहे. परिणामी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाहीत, असे, तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे.