बारामती : राज्यातील ३८ लाखांहून अधिक बेरोजगार तरुणांनी रोजगार मिळविण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यांपैकी ९ लाख ५० हजार बेरोजगार महिला आहेत. रोजगार निर्माण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे; मात्र सरकरा या विषयात नापास झाले आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
बारामती येथे आयोजित सह्याद्री करीअर अॅकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर लिखित पोलीस भरती पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. पवार म्हणाले, रोजगार निर्मितीसाठी गुंतवणुकीला अनुकुल वातावरण निर्मिती होणे आवश्यक आहे. नोटाबंदीमुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. अनेकांचे व्यवसाय,रोजगार बुडाला. शासनाने नोकरभरती बंद केली आहे. एमपीएससी,यूपीएससी च्या परीक्षा वेळेवर होत नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी तरुणांनी ठोस भुमिका घ्यावी.अॅकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर यांनी प्रास्तविक केले. यावेळी प्रशांत काटे, संजय भोसले,सचिन सातव, नगरसेवक सुधीर पानसरे, रुपनवर उपस्थित होते. सुत्रसंचालन अनिल रुपनवर यांनी केले.