घोटवडे : मुळशी तालुका शिवसेना, युवासेना यांच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मराठा आरक्षणदाखला नोंदणी हा कार्यक्रम सुरू झाला. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा बांधवांनी शांततामय मोर्चे काढून हे आरक्षण मिळविले व शासनाने १६ टक्के आरक्षण दिले.जास्तीत जास्त युवकांनी विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभागी होऊन आरक्षण दाखला नोंदणी करावी, असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे यांनी केले. युवा सेना जिल्हाध्यक्ष अविनाश बलकवडे यांनी प्रास्ताविक केले. सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे व भोर विधानसभा समन्वयक प्रकाश भेगडे यांनी शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केले.यावेळी बबनराव दगडे, संतोष मोहोळ, पं. स. सदस्य विजय केदारी, संतोष तोंडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख जोती चांदेरे, हिराबाई पडलघरे, भानुदास पानसरे, संतोष बुचडे, ज्ञानेश्वर डफळ, गणेश भोईने, अमोल मोकाशी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रतीक दगडे, संदीप आमले, प्रवीण गोडाम्बे, विदुर देवकर, लक्ष्मण कानगुडे, नारायण आमले, अविनाश आमले, दत्तात्रय दगडे, सोमनाथ कोळेकर आदी कार्यकर्त्यांनीसहकार्य केले.
मराठा आरक्षण दाखला नोंदणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 1:59 AM