शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

अंगणवाडीतार्इंचा थाळीनाद, मिनी अंगणवाडी नियमित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 1:12 AM

‘२५ पेक्षा कमी पटसंख्या असलेली अंगणवाडी केंद्रे बंद करण्याचा आदेश रद्द करा, लाईन लिस्टिंग आधार नोंदणीची सक्ती रद्द करा.

पुणे : ‘२५ पेक्षा कमी पटसंख्या असलेली अंगणवाडी केंद्रे बंद करण्याचा आदेश रद्द करा, लाईन लिस्टिंग आधार नोंदणीची सक्ती रद्द करा... आदी मागण्या करीत अंगणवाडीसेविकांच्या एकजुटीचा विजय असो... हमारी युनियन, हमारी ताकद...’ अशा घोषणा देत शुक्रवारी सुमारे दोन हजार अंगणवाडीसेविकांनी जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे प्रशासनाला देण्यात आला.अंगवाडीसेविकांच्या विविध मागण्या अनेक दिवसांपासून शासनाकडे प्रलंबित आहेत. यामुळे अनेक सुविधांना अंगणवाडीसेविका आणि कर्मचारी वंचित असल्याचा आरोप यावेळी महराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश दातखिळे यांनी केला. आज महिला आणि बालविकास विभाग आयुक्त आणि जिल्हा परिषदेसमोर आज थाळीनाद आंदोलन करण्यात आले. सकाळी १२ वाजता सर्व अंगणवाडी कर्मचारी आणि सेविका ससून रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एकत्र आल्या. येथून थाळीनाद मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सर्व आंदोलकांनी महिला आणि बाल कल्याण आयुक्तालयापुढे ठिय्या दिला. यावेळी विभागीय आयुक्त दिलीप हिवराळे यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी हिवराळे यांनी राज्य स्तरावरील मागण्या या शासनस्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिले. तसेच, जिल्हास्तरीय मागण्या या जिल्हा प्रशासनस्तरावर सोडविण्याचे आश्वासन दिले. यानंतर मोर्चा हा जिल्हा परिषदेवर वळविण्यात आला. सर्व आंदोलकांनी घोषणाबाजी करीत जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे धरले. या वेळी त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता.जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, महिला आणि बाल कल्याण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, सदस्य विठ्ठल आव्हाळे यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले तसेच मागण्या पूर्ततेचे आश्वासन दिले. आंदोलनात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सहसचिव विठ्ठल करंजे, सविंद्रा बोºहाडे, सुमन फदाले, शैलजा कोरहळे, शारदा शिंदे, अनिता गुंजाळ, सरला उडणे, नयना वाळुंज, सीता मिसाळ, छाया भुजबळ, सुरेखा शिनगारे, भाग्यश्री जोशी, रंजना कानडे, शहेनाज पठाण, बिल्कीज काझी, रशीदा बेग, शाहीन आरकाठी, सुरेखा कारंडे, नीता पायगुडे, बिस्मिल्ला तांबोळी, संगीता रायकर, सविता रायकर, शिवरकरताई, रेश्मा शिंदे, स्वाती भेगडे, सारिका रूपवते, उज्ज्वला देडगे, सुनीता लोंढे, गजगजताई, रेखा कांबळे, मंजुळा झेंडे तसेच सर्व बीट प्रतिनिधी उपस्थित होत्या.>२५ पेक्षा कमी मुले असतील, तर ती अंगणवाडी केंद्रे बंद करून शेजारच्या अंगणवाडी केंद्रांत समाविष्ट करण्याचा आदेश रद्द करावा.लाईन लिस्टिंगच्या व आधार नोंदणीच्याकामाची सक्तीबंद करा. नगरपालिकाआणि महापालिकांकडे अंगणवाडी केंद्रांचे होणारे हस्तांतर आदेश रद्द करण्यात यावा. मिनी अंगणवाडी केंद्रांचे रूपांतर नियमित अंगणवाडी केंद्रात करा. अंगणवाडी केंद्रांचे भाडे नवीन जीआर प्रमाणे द्या, बचत गटाची आहाराची बिले व फेडरेशनअंतर्गत आहारातील थकीत इंधन बिले देऊन, इंधन दरात वाढ करा.सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, एकरकमी सेवासमाप्तीच्या लाभाची रक्कम तातडीने जमा करा.>अंगणवाडीसेविकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील २५ पेक्षा कमी पटसंख्या असणाºया अंगणवाड्या बंद करण्यात येणार नाहीत. तसेच, पोषण आहाराच्या इंधनदर ५० पैशांवरून ६५ पैसे करण्यात येईल. याचबरोबर सेवानिवृत्त एकरकमी लाभाचे १३५ लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली आहे. - राणी शेळके,सभापती महिला आणि बालकल्याण विभाग