शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

अपंग ‘कल्याणा’चा आधार पुन्हा खिळखिळा, बालाजी मंजुळे यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 3:09 AM

बालाजी मंजुळे यांची बदली : साडेअठरा वर्षांत १३ आयुक्त, केवळ दोनच अधिकारी पूर्ण करू शकले कार्यकाळ

पुणे : दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी स्थापण्यात आलेल्या आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची काही महिन्यांतच बदली करण्याचा राज्यसरकारने कायम ठेवला आहे. अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची अवघ्या ५२ दिवसांमध्ये नंदुरबारच्या जिल्हाधिकारीपदी बदली केली आहे. गेल्या साडेअठरा वर्षांमध्ये या आयुक्तालयाने तब्बल १३ अधिकारी पाहिले आहेत. अवघे दोनच अधिकारी आपला कार्यकाल पूर्ण करु शकले आाहेत. उर्वरित अधिकाºयांनी सरासरी ११ महिने देखील कार्यकाल मिळाला नाही.

राज्यात २००० साली अपंग कल्याण आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. राज्याचे पहिले अपंग कल्याण आयुक्त म्हणून सी. ए. पाठक यांनी पदाभार स्वीकारला. त्यांनी दोन वर्षे या पदावर काम केले. आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर आर. के. गायकवाड आणि बाजीराव जाधव या ज्येष्ठ सनदी अधिकाºयांनी कार्यकाल पूर्ण केला. गायकवाड यांना चार वर्षे ५ महिने आणि जाधव यांना ४ वर्षे ४ महिने कार्यकाल मिळाला. म्हणजेच साडेअठरा वर्षांतील साडेआठ वर्षे या दोन अधिकाºयांनी काम पाहिले. उर्वरित अकरा अधिकाºयांना दहा वर्षांचा कालावधी मिळाला. राज्यात सुमारे २९ लाख दिव्यांग असून त्यांना आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देणे, राज्य व केंद्र शासनाकडून दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाºया योजनांची अंमलबजावणी करणे, दिव्यांगांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे काम आयुक्तालयाकडून केले जाते. मात्र, काही अधिकारी या पदाला दुय्यम पोस्ट समजतात. त्यामुळे पदावर रुजू झाल्यानंतर काही महिन्यांतच ते बदली करून घेत असल्याचे आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले. काही अधिकाºयांनी दोन ते आठ महिनेच आयुक्तपदी काम पाहिले आहे. दरम्यान आत्ताचे आयुक्त मंजुळे ३१ डिसेंबर २०१८ रोजी आयुक्तालयात रुजू झाले. पदभार घेतल्यानंतर त्यांनी कामचुकार करणाºया उपायुक्तांना पुन्हा राज्य सरकारच्या सेवेत पाठविण्याची कारवाई केली होती. तसेच, दिव्यांगांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, क्रीडा प्रबोधिनीदेखील प्रस्तावित केली होती. याशिवाय दिव्यांगांना ओळख मिळावी यासाठी युनिक कार्ड वितरणाची मोहीमही हाती घेतली होती. अल्पकाळात त्यांनी दिव्यांग विकास धोरणावर काम करण्यास सुरुवात केली होती. अवघ्या दोन महिन्यांच्या आत झालेल्या त्यांच्या बदलीने अपंग कल्याण आयुक्तालयाचे कामकाज पुन्हा खिळखिळे झाले असल्याचे बोलले जात आहे.प्रहार करणार बदलीविरोधात आंदोलनअपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची तडकाफडकी बदली केल्याच्या निषेधार्थ प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने गुरुवारी (दि. २१) समाज कल्याण आयुक्तालयासमोर दुपारी १२ वाजता निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा संघटक सुनील शिंदे यांनी दिली. अपंग कल्याण आयुक्तालयात अपवाद वगळता अधिकारी आपला कालावधी पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे आयुक्तालयाच्या कामास खीळ बसत आहे. मंजुळे यांनी अल्पावधीतच दिव्यांगांच्या कल्याणकारी धोरणाला चालना मिळेल, असे निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांची तत्काळ केलेली बदली धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया संयुक्त अपंग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे यांनी व्यक्त केली.अपंग कल्याण आयुक्तांचा कार्यकालअधिकाºयाचे नाव पद स्वीकारले पद सोडलेसी. ए. पाठक २४/१०/२००० २/१०/२००२सोनिया सेटी ३/१०/२००२ ७/११/२००२डॉ. संजय चहांदे ८/११/२००२ १९/४/२००३डॉ. के. एच. गिविंदराज २०/४/२००३ ३०/६/२००४आर. के. गायकवाड ८/८/२००४ ११/१/२००८नितीन गद्रे ११/१/२००८ १०/१०/२००८एम. एच. सावंत ७/२/२००९ ५/१०/२०१०बाजीराव जाधव ५/१०/२०१० २८/२/२०१४ज्ञा. स. राजुरकर २८/२/२०१४ ६/८/२०१४नरेंद्र पोयाम २६/८/२०१४ २२/५/२०१६नितीन पाटील १६/६/२०१६ १३/४/२०१८रुचेश जयवंशी १९/४/२०१८ १४/११/२०१८बालाजी मंजुळे ३१/१२/२०१८ २०/२/२०१९

टॅग्स :Puneपुणे