शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

नव्या बांधकामांना पुन्हा स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:39 AM

बांधकाम पूर्ण झालेल्या बांधकामांना आॅक्युपेशन सर्टिफिकेट (ओसी) न देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पुढील दोन आठवड्यांसाठी कायम ठेवत पुणे महापालिकेला पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे.

बालेवाडी : बाणेर व बालेवाडी परिसरातील नव्या बांधकामांना कमेन्समेंट सर्टिफिकेट (सीसी) व बांधकाम पूर्ण झालेल्या बांधकामांना आॅक्युपेशन सर्टिफिकेट (ओसी) न देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पुढील दोन आठवड्यांसाठी कायम ठेवत पुणे महापालिकेला पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. त्यामुळे या भागातील सुमार ६० ते ६५ प्रकल्प अडचणीत आल्याची माहिती हाती आली आहे.आजच काही ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर बनू शकतो. त्यामुळे उपनगरातील वाढती लोकवस्ती पाहता पाणीपुरवठा वाढवणे पालिकेला बंधनकारक आहे. अन्यथा तिथली लोकवस्ती मर्यादित ठेवण्याव्यतिरिक्त पर्याय उरणार नाही, असे मत आज मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने नोंदवत बंदी उठविण्यास साफ नकार दिला. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे पालिकेने दरदिवसाला प्रतिव्यक्तीमागे १५० लीटर पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र पुणे महानगरपालिका हा पुरवठा करण्यात साफ अपयशी ठरत असल्याचा दावा याचिकाकर्ते विद्यमान नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने अ‍ॅड. अनुराग जैन यांनी केला.दरम्यान, न्यायालयाने स्थगिती आदेश आणखी दोन आठवडे वाढविल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. ओसी मिळत नसल्याने अनेक रहिवाशांचे गृहप्रवेशही लांबणीवर पडले असून त्यांचीसुद्धा कोंडी झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याबाबत क्रेडाई गांभीर्याने विचार करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून काळात आहे.> २ आठवड्यांत उत्तर देण्याचे पालिकेला निर्देशयासंदर्भात पुणे महानगरपालिकेला २ आठवड्यांत सविस्तर उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. बाणेर, बालेवाडी भागातील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नगरसेवक अमोल बालवडकर यांनी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने या परिसरातील बांधकामांना ओसी आणि सीसी देऊ नये, असे आदेश दिले होते.