लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मोटार अपघात न्यायप्राधिकरणाची ३०० प्रकरणे लोक अदालतमध्ये ठेवण्यात आली होती. तडजोडीअंती निकाली काढण्यात आलेल्या सुमारे १४५ दाव्यामध्ये तब्बल साडेसात कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दर तीन महिन्यांनी लोक अदालतीचा उपक्रम आयोजित करण्यात येतो. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि प्रमुख न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे १४५ दावे निकाली काढण्यात आले. विमा कंपनीमध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने सर्वाधिक ५० दाव्यात तडजोड केली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. जे. घरत, अॅड. अतुल गुंजाळ आणि सुरेंद्र दातार यांच्या पॅनलने हे दावे निकाली काढले.पीएमपीचा लोक अदालतमध्ये सहभागशनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये पीएमपीने प्रथमच सहभाग नोंदवून ८ दाव्यात तडजोड करून ८० लाख रुपये नुकसानभरपाई दिली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जे. डी. वडणे, अॅड. जयश्री वाकचौरे आणि अॅड. सुभाष किवडे यांच्या पॅनलने हे दावे निकाली काढले. पीएमपीच्या वतीने अॅड. अतुल गुंजाळ, सरव्यवस्थापक अशोक जाधव आदींनी तडजोडीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
मोटार अपघातात साडेसात कोटींची नुकसानभरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 2:58 AM