शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांचे परवाने रद्द

By admin | Published: October 21, 2015 1:12 AM

रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातही ऐन सणासुदीत या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, याबाबतच्या तक्रारींचे प्रमाणही दिवसें

पुणे : रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातही ऐन सणासुदीत या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, याबाबतच्या तक्रारींचे प्रमाणही दिवसें दिवस वाढत आहे. त्यामुळे भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला असून त्यानुसार, गेल्या दोन दिवसांत तब्बल ६०० रिक्षाचालकांचे वाहन परवाने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष पथके स्थापन करण्यात आली असून, ती रेल्वेस्थानके आणि बस स्थानकांच्या परिसरात तैनात करण्यात आली आहेत. रिक्षाचालकाने भाडे नाकारताच, या पथकाकडून तत्काळ कारवाई केली जात आहे.शहरात सणांमुळे खरेदीसाठी बाहेर गावांवरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. मात्र, प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी रिक्षाचालकांकडून भाडे नाकरण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याबाबतच्या तक्रारींचा पाऊस गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांकडे करण्यात येत आहे. मोटार वाहन अधिनियमानुसार, अशा प्रकारे भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकास केवळ ५० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. हा दंड नाममात्र असल्याने हे प्रकार मोठ्या संख्येने वाढले आहेत. त्याला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली असून, दंडाचा फरक पडत नसल्याने भाडे नाकारणाऱ्या संबधित रिक्षा चालकाचा परवाना काही कालावधीसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सोमवारी (दि.१९) आणि मंगळवारी सुमारे ६२० परवाने जप्त करण्यात आले असून ते निलंबनासाठी आरटीओ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली. ठिकाण निश्चिती केलीही मोहीम सुरू करण्यापूर्वी शनिवारी साध्या वेशातील पोलिसांनी भाडे नाकारल्या जाणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली होती. त्यानुसार, अशी ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, त्या ठिकाणी कारवाईसाठी पथक तैनात करण्यात आले आहे.- सारंग आवाड, उपायुक्त, वाहतूक पोलीसबेकायदेशीर वाहतूक, परवाना नसने यांच्यावर कारवाई करणे अभिप्रेत आहे. अनेकदा कमी अंतरासाठी भाडे घेतले जात नाही. मात्र, त्यांच्यावर कारवाई करताना, त्यांनाही बाजू मांडण्याची संधी मिळावी. चालकांकडून एवढा मोठा गुन्हा केला जात नाही की, साध्या वेशात त्यांच्यावर कारवाई केली जावी. चालकांनाही अशा प्रकारे भाडे नाकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. - नितीन पवार, निमंत्रक, रिक्षा पंचायत