Supriya Sule: 'नाती पंधराशे रुपयांनी जोडली जात नाहीत; मनाने जोडली जातात', सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 03:45 PM2024-08-12T15:45:57+5:302024-08-12T15:47:25+5:30

भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी आपल्याला सरकार बदलायचे आहे

'Relationships are not joined by fifteen hundred rupees; They are connected by the mind', Supriya Sule's advice to Ajit Pawar | Supriya Sule: 'नाती पंधराशे रुपयांनी जोडली जात नाहीत; मनाने जोडली जातात', सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

Supriya Sule: 'नाती पंधराशे रुपयांनी जोडली जात नाहीत; मनाने जोडली जातात', सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

बारामती : ‘पवारसाहेब’ आणि बारामतीकरांचे सहा दशकाचे प्रेमाचे ऋणानुबंध आहेत. त्यासाठी कोणतीही योजना नाही.नाती १५०० रुपयांनी जोडली जात नाहीत.ती मनाने जोडली जातात.मला विचारालं तर तो नात्यांचा अपमान आहे.नाती ‘दिलसे’ असतात.पैशाच्या नात्यांना व्यवहार म्हणतात. नात्यांमध्ये प्रेम असतं,व्यवहार नसतो. ज्यांना नातीच  कळाली नाहीत, त्यांच्याकडुन काय अपेक्षा करणार, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी योजनेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांचे नाव न घेता टोला लगावला.

 शरदचंद्र पवार पक्षातर्फे आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या महावीर भवन येथे आयोजित सभेत त्या बोलत  होत्या. यावेळी सुळे पुढे म्हणाल्या, लोकसभा निवडणूकीच्यावेळी आपल्या हातात कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कोणतेही सत्ता केंद्र हातात नव्हते. पण मायबाप जनता सोबत असल्यामुळे आपण विजयी होऊ शकलो. बारामती आपली आण बाण आणि शान आहे, पण बारामती मध्ये अनेक विकास कामांमध्ये गुणवत्ता नसल्याचे दिसून आले आहे.  त्यामुळे येथील विकासकामांमध्ये आपण लक्ष घालणार असल्याचे सांगितले. भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी आपल्याला सरकार बदलायचे आहे, त्यामुळे सर्वांनी तयारीला लागावे असे आवाहन सुळे यांनी केले.

Web Title: 'Relationships are not joined by fifteen hundred rupees; They are connected by the mind', Supriya Sule's advice to Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.