शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

साहित्यासाठी विद्यार्थ्यांची परवडच, शिक्षकांनी जुळवले ठेकेदारांशी संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 5:29 AM

शालेय साहित्याच्या खरेदीत होणारा भ्रष्टाचार थांबवावा, म्हणून प्रशासनाने सुरू केलेल्या डीबीटी (थेट लाभार्थी योजना) योजनेचा बोजवारा उडाला असून अजूनही अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही.

पुणे : शालेय साहित्याच्या खरेदीत होणारा भ्रष्टाचार थांबवावा, म्हणून प्रशासनाने सुरू केलेल्या डीबीटी (थेट लाभार्थी योजना) योजनेचा बोजवारा उडाला असून अजूनही अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. शालेय साहित्याचेही यथातथाच वाटप झाले असून प्रशासनाकडूनच आता याकडे कानाडोळा केला जात असल्याच्या तक्रारी पालक करीत आहेत.शाळेतील काही शिक्षकांनी ठेकेदारांशी हितसंबंध जुळवले असून विशिष्ट ठेकेदारांनाच शाळेत येऊन विद्यार्थ्यांना साहित्य व गणवेशवाटप करू दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने बहुसंख्य शाळांमध्ये गणवेश व शालेय साहित्य दिले असल्याचे सांगण्यात येते, मात्र येरवडा तसेच शहराच्या अन्य उपनगरांमधील शाळांमध्ये हे साहित्य अजूनही पोहोचलेले नाही. ठेकेदारांकडून नव्या रंगाचे गणवेश तयार झाले नसून त्यामुळे त्यांनी शाळांमधील शिक्षकांबरोबर थेट संपर्क साधून आमच्याशिवाय अन्य कोणाला वाटप करू देऊ नका, असे सांगितले असल्याचे बोलले जात आहे.महापालिकेच्या सुमारे २८७ शाळा असून त्यात जवळपास ८८ ते ९० हजार विद्यार्थी आहेत. त्या सर्वांना गणवेशाचे दोन जोड, तसेच शालेय साहित्याचे वाटप महापालिकेकडून करण्यात येते. दरवर्षी त्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे प्रशासनाने यावर्षीपासून विद्यार्थ्यांना कार्ड दिले आहे. त्यांनी ते कार्ड दाखवून त्यावर हव्या त्या दुकानातून त्यांना पसंत असेल, तशी खरेदी करणे अपेक्षित होते. त्यासाठी प्रशासनाने ४३ व्यावसायिक निश्चित केले होते.या व्यावसायिकांनी थेट शाळांमध्ये जाऊन साहित्याचे वाटप करणे व विद्यार्थ्यांकडून कार्ड घेऊन ते स्वाईप करणे सुरू केले आहे. ते वाटप करीत असलेल्या साहित्याचा, गणवेशाचा दर्जा सांभाळण्याची काहीच तरतूद या योजनेत नसल्यामुळे सगळाच सावळा गोंधळ यात निर्माण झाला आहे. भांडार अधिकाºयांनी काही साहित्याची तपासणी करणार व दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करणार असे जाहीर केले. त्याप्रमाणे तीन व्यावसायिकांना नोटिसाही देण्यात आल्या, मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला दिसत नाही.बहुसंख्य शाळांमध्ये गणवेश व साहित्याचे वाटप झाले आहे. तपासणीत जे दोषी आढळले त्यांना नोटिसा दिल्या. फार जण दोषी आढळलेले नाहीत. ज्या शाळा राहिल्या आहेत तिथेही लवकरच वाटप होईल, याची काळजी घेतली जाईल. कोणाची तक्रार असल्यास त्यांनी भांडार विभागाशी संपर्क साधावा.- तुषार दौंडकर, भांडार अधिकारी, महापालिका

टॅग्स :Schoolशाळा