शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

अनधिकृत बांधकामांना दिलासा?

By admin | Published: December 16, 2015 2:58 AM

गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आली. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील लाखो

पिंपरी : गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आली. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील लाखो बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, रेड झोन, प्राधिकरण, म्हाडा परिसरातील बांधकामधारकांवर टांगती तलवार कायम आहे.नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. महसूल विभागाच्या पुरवणी मागण्यासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना खडसे यांनी भूमिका मांडली. आरक्षणाची बाधा नसलेल्या स्वत:च्या मालकीच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येतील, तसेच तुकडाबंदीचा कायदा शिथिल करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यामुळे बांधकामधारकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिले होते. मात्र, सत्ता येऊन वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटला, तरी अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही. महापालिका क्षेत्रात २०१२मध्ये उच्च न्यायालयास सादर केलेल्या अहवालानुसार ६५ हजार अनधिकृत बांधकामे आहेत. त्यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण, एमआयडी, नदीपात्र, रेड झोन भागातील बांधकामांचा आजचा आकडा पाहिल्यास ही संख्या एकूण मिळकतींच्या निम्मी आहे. याविषयीची चर्चा विधानसभेत झाली होती. त्या वेळी १ एप्रिल २०१२नंतरचे बांधकाम होऊ देऊ नयेत, याविषयी महापालिकेस शासनाने आदेश दिले होते. त्यापूर्वीची बांधकामे नियमित करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिले होते. त्यानुसार सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली. त्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर होण्यापूर्वीच राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता गेली. (प्रतिनिधी)२२२४ बांधकामांना नोटिसा-मार्च २०१२नंतरच्या अ, ब, क, ड, इ, फ या प्रभागांतर्गत २२२४ बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात महापालिका आरक्षण, नियोजित रस्ते, पूररेषा, हरित पट्ट्याच्या जागेवर ३६५, स्वत:च्या जागेवर १०४३, व्यावसायिक स्वरूपाच्या ६९८ बांधकामांचा समावेश होता. त्यापैकी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने ८३० बांधकामे पाडली आहेत. अन्य बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू आहे. अहवाल सादर होणार कधी? -सीताराम कुंटे समितीने राज्य शासनास अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. अहवालानुसार कार्यवाही करण्यापूर्वी महसूल विभागाककडून सूचना मागविली आहे. भाजपा, शिवसेनेचे सरकार येऊन वर्ष उलटले, तरी अहवाल विधानसभेच्या पटलावर आणलेला नाही. अहवाल का सादर होत नाही, यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहवाल सादर करून अनधिकृत बांधकामांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.