पुणे : चित्र नाही चरित्र बदला. चित्र बदल्यामुळे प्रगती होत नाही, तर जीवन समृद्ध करण्यासाठी चारित्र्यसंपन्नता हवी. आजकाल चित्राचा प्रगतीसाठी आधार घेतला जातो. चारित्र्य मूल्यांचे अध:पतन होत असून, चारित्र्य सुधारण्यासाठी धर्म हा एकमेव मार्ग आहे असे मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज यांनी सांगितले. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र जैन सांस्कृतिक मंडळ येथे प्रसन्नसागरजी महाराज यांचे आगमन झाले. येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक यांनी मुनीश्रींना श्रीफळ अर्पण केले. या प्रसंगी मुनीश्रींनी महापौरांना धर्मग्रंथ भेट देऊन आशीर्वाद दिले. कार्यक्रमास अॅड. अभय छाजेड, श्याम मानकर, मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई, डॉ. शैलेश गुजर, डॉ. कल्याण गंगवाल, राजकुमार दोशी, महेशभाई मेहता, अभय कोठारी, वीरकुमार शहा, अजित पाटील, मोहन डोर्ले, अविनाश दोशी, सुदीन खोत, डॉ. विक्रम काळुसकर, अरविंद जैन, अरविंद दोशी, महाराष्ट्र पेपर्सचे महावीर शहा, अचल जैन, अचल फडे, भूषण शहा, मीना फडे, सुवर्णा शहा, पद्मा भूस, डॉ. पल्लवी काळुसकर, आनंदी शहा, ज्योती शहा आदी उपस्थित होते. जैन सहयोगचे अध्यक्ष मिलिंद फडे, जितेंद्र शहा, सुजाता शहा यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)
धर्म हा चारित्र्य सुधारण्याचा मार्ग
By admin | Published: March 27, 2017 3:25 AM