गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस ठाण्यात आायोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे, पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस पाटील विलास येसकर ,शैलैश पवार, यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील गावाचे पोलीस पाटील, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
घुगे म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती पाहता सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार गणेशभक्तांनी गणेशमूर्तीची स्थापना करावी. कोणीही मिरवणूक काढू नये, ग्रामीण भागात शक्यतो एक गाव-एक गणपती ही संकल्पना सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन राबविली पाहिजे.
काेट.....
शहर, परिसरात कोणाचीही भाईगिरी सहन केली जाणार नाही. नागरिकांनी यासंदर्भात थेट माझ्याशी संपर्क साधावा. तक्रारदाराने नाव गुपित ठेवण्यात येईल. रोडरोमियोविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात येणार आहे.
विनोद घुगे, पोलीस निरीक्षक.
०२ दौंड पोलीस
दौंड येथे शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे.