गेली दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे सर्वच यात्रा रद्द झाल्याने भाविकांना देवदर्शन घेता आले नाही. सोमवारी सकाळी जेजुरीगडावर कोरोनाचे सर्व नियम पळून मोजके पुजारी सेवक वर्ग, देवाचे मानकरी यांनी पूजा, अभिषेक आदी धार्मिक विधी केले. सकाळी आठ वाजता फुलांनी सजवलेल्या मोटारीतून वाहनात उत्सवमूर्तीं ठेवून हा सोहळा कऱ्हा नदीवर विसावला. कऱ्हा नदीवर कऱ्हेच्या पाण्याने देवाला स्नान घालण्यात आले.
यावेळी धार्मिक विधी व महाआरती होऊन पुन्हा उत्सवमूर्ती जेजुरीगडावर नेण्यात आल्या व सोमवती यात्रेची सांगता झाली. यात्रा रद्द झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होऊनही अनेक भाविक जेजुरीत आले होते. मात्र मंदिर बंद असल्याने त्यांना दर्शनाविना पुन्हा परतावे लागले. जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली या वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोरोनाचे नियम पाळून धार्मिक विधी गेली दोन वर्षे जेजुरी गडावरील सर्व यात्रा कोरोनाच्या संकटामुळे रद्द झाल्या आहेत. प्रत्येक यात्रेला सध्या केवळ धार्मिक विधी केले जातात. आजही केवळ मोजक्या मानकरी वर्गाने जेजुरी गडावर व कऱ्हा नदीवर देवाचे धार्मिक विधी केले. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढी परंपरा व धार्मिक विधीला या सोहळ्यात महत्व देण्यात आले असल्याचे श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे पाटील यांनी सांगितले. या सोहळ्यात मोजके देवसंस्थानचे विश्वस्त, पुजारीसेवकवर्ग,पालखी सोहळ्याचे मानकरी देवसंस्थानचे कर्मचारी सहभागी झाले होते.
060921\img_20210906_132652.jpg
?????? ??????????????? ?????? ????? ??????? ????