औंध येथील पुणे महानगपालिकेच्या कुटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, लहान मुलांचे लसीकरण केंद्र आणि संपूर्ण यंत्रणा बालेवाडी येथे स्थलांतरित करणार होते. औंध ग्रामस्थ रहिवासी, विविध संस्था यांनी रुग्णालय हलवू नये यासाठी प्रयत्नही केले होते. त्यांच्या प्रयत्नाना यश आले असून कुटी रुग्णालयाचे स्थलांतर रद्द करण्यात आले आहे.
औंध येथील नागरिक व रुग्णांच्या दृष्टीने हा निर्णय योग्य नव्हता. या भागातील बरेच नागरिक रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत . तसेच याठिकाणी लहान मुलांचे लसीकरण केंद्रही आहे. त्यामुळे लहान मुलांच्या दृष्टीने रुग्णालयात योग्य सुविधाही उपलब्ध झाल्या आहेत.
नागरिकांनी रुग्णालय स्थलांतरित होऊ नये. यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याशी संपर्क साधून निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले. त्यामुळे स्थलांतरित करण्याचा निर्णय स्थगित केला आहे. कुटी रुग्णालय पुन्हा पूर्ण क्षमतेने चालू झाले आहे.