शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

ऋणानुबंध कधी दूर जात नसतात - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 12:41 AM

प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही वाद असतात. पण जो ऋुणानुबंध असतो, संबंध असतात, ते कधी दूर जात नसतात. संजयला परका कसा म्हणायचा, तो आपल्याच विचाराचा आहे.

बारामती - प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही वाद असतात. पण जो ऋुणानुबंध असतो, संबंध असतात, ते कधी दूर जात नसतात. संजयला परका कसा म्हणायचा, तो आपल्याच विचाराचा आहे. यापुर्वी काही झालं असेल ते स्थानिक पातळीवरील संघर्षातून झालं. प्रवेश हा अन्य ठिकाणी विचारांनी वेगळे असलेल्यांचा प्रवेश असतो. संजय शिंदे यांचा प्रवेश का म्हणायचा असा सवाल राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.बारामती येथे आयोजित कार्यक्रमात पवार यांच्यासह सोलापुर, सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी पवार म्हणाले, सोलापूर जिल्ह्याशी आपले पूर्वीपासून संबंध आहेत. यामध्ये नामदेवराव जगताप,विठ्ठलराव शिंदे,गणपतराव देशमुख अशी अनेक नावे आहेत.माढा तालुक्यात खट्ट वाजल तरी विठ्ठलराव हक्काने सांगायचे,तो प्रश्न आम्ही निकाली लावायचो.संजय शिंदे म्हणाले, ‘‘ राष्ट्रवादीपासून आपण फार लांब ही गेलो नव्हतो. अन्य कोणत्याही पक्षात सहभागीही झालेलो नव्हतो. शरद पवार व आमच्या कुटुंबियांचे पिढ्यानपिढ्या ऋणानुबंध आहेत. अनेकवेळा विविध अडचणी आल्यानंतर शरद पवार यांनी सहकार्य केलेले आहे,त्यामुळे मी राष्ट्रवादीच्या विचारांचाच होतो.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात काही घडामोडी झाल्या.जिल्ह्याचे नेतृत्व दिलेल्या लोकांनी चुकीचे काम केले. त्या मंडळींनी सहकारी संस्था,पतसंस्था बँका यामध्ये चुकीची कामे केल्याने जिल्ह्यातील शरद पवार यांच्या विचारांवर प्रेम करणारा मतदार काही प्रमाणात बाजूला गेला.याबाबत आपण २०१४ च्या निवडणुकीपुर्वी पत्रही दिले होते. त्याचे परिणाम आज पहायला मिळतात.’’विरोधी पक्षात जाणाऱ्यांची कारणे अनेक आहेत. कोणाच्या अडचणी आहेत. कोणाचे देणे आहेत, हे सर्वसामान्य लोकांनाही माहिती आहे., असा टोला यावेळी शिंदे यांनी मोहिते-पाटील यांचे नाव न घेता लगावला. मी कोणत्याही अडचणीसाठी आलो नसून शरद पवार यांच्या प्रेमापोटी आलो असल्याचे शिंदे यांनी म्हणाले. यावेळी विधानपरीषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बबन शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दीपक साळुंखे, रश्मी बागल, सुनिल माने यांची भाषणे झाली. माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पुणे जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वास देवकाते,बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते.कागदाचे विमान बनविले नाही, त्यांना विमान बनविण्याचे काम दिलेराफेलप्रकरणी टीका करताना पवार म्हणाले, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना फ्रान्सच्या राफेल कंपनीबरोबर चर्चा झाली. एका विमानाची किंमत ३५० कोटी सांगितली होती.निवडणुकीमुळे तो निकाल राहिला. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर यावर निर्णय झाला.३५० कोटीच्या विमानाची २०१५ मध्ये ७५० कोटी रुपये किंमत झाली.आज तेच १६६० कोटींना गेले. आपण विमाने घेतो,त्यावेळी काही विमान घेउन त्याचे तंत्र घेतो.बाकीची विमान आपण तयार करतो. देशात सरकारचा लखनौ, नाशिकला विमान बनविण्याचा कारखाना आहे.मात्र, या सरकारने विमान बनविण्याचा अधिकार सरकारी कंपनीला दिले नाही. रिलायन्स कंपनीला दिले.त्या कंपनीने आता जमीन घेतली. इमारत बांधली नाही. यंत्रणा बसविलेली नाही. ज्यांना काम दिले त्यांनी कागदाच विमान सुध्दा बनविले नाही अशांना विमान बनविण्याचे काम दिले.याचा अर्थ हा व्यवहार स्वच्छ नाही. .आम्ही चौकशीची मागणी केली.ती देखील केंद्र सरकारने मान्य केली न्नाही. राजीव गांधी प्रधानमंत्री होते.त्यावेळी बोफोर्सची तोफ घेतली होती.त्यांच्यावर आरोप करण्यात आले. राजीव गांधी यांनी चौकशीचे आदेश दिले, त्यामध्ये काही निघाले नाही. त्यावेळी त्यांच्यावर आरोप करणारे आज सत्ताधारी आहेत. या प्रकारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक