पुणे महापालिकेलाच मिळेना रेमडेसिविरच्या तुटवड्याच्या विरोधात पुण्यात आज भाजपच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पण प्रत्यक्षात मात्र पुणे महापालिकेलाच रेमडेसिविर मिळत नसल्याचं स्पष्ट झालंय.
एकुण रेमडेसिविरचा तुटवडा लक्षात घेता पुणे महापालिकेनेच रेमडेसिविर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र या टेंडरला कोणत्याही कंपनी कडुन प्रतिसादच मिळत नसल्याची माहिती महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी दिली.
जवळपास ५० हजार इंजेक्शन खरेदी करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. मात्र त्याला कंपन्यांकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनेक कंपन्यांना वैयक्तिक पातळीवर संपर्क साधून देखील त्या कंपन्यांकडुन प्रतिसाद मिळत नसल्याचे बिडकर म्हणाले.
“ रेमडेसिविरचे टेंडर आम्ही फ्लोट केले आहे. परंतु त्याला प्रतिसाद मिळत नाहीये. मी, चेअरमन आयुक्त आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांशी वैयक्तिक पातळीवर संपर्क साधला. तरीही काहीही प्रतिसाद आला नाही. टेंडर प्रक्रियेत ते भाग घेवु इच्छित नाहीत तर ६७(३)क खाली खरेदी करण्याची तयारी देखील आम्ही दाखवली. “