तळेगाव ढमढेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाजार मैदानात अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानासमोर बाजार मैदानाच्या जागेत आपले व्यवसाय थाटले आहेत. तसेच अनेकांनी हातगाड्या रस्त्यावर उभ्या करत अतिक्रमण केले आहेत. ग्रामपंचायतच्या बाजार मैदानात अतिक्रम करत व्यवसाय केला जात आहे. मात्र, ग्रामपंचायतला कोणताही कर भेटत नाही. तसेच या बाजार मैदान परिसरात असलेले जुने स्वच्छता गृह सपाट केले असून जवळच दुसरे बांधलेले स्वच्छतागृह याचीही दुरवस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ग्रामपंचायतच्या वतीने येथे पुरुषांसाठी तीन व महिलांसाठी दोन स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात यावेत तसेच बाजार मैदानात व्यवसाय थाटणाऱ्या व्यावसायिकांकडून कर आकारणी करण्यात यावी अन्यथा शिरूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शिरूर तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी ग्रामपंचायतला देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.
कोट
तळेगाव ढमढेरे बाजार मैदान येथील व्यावसायिकांना यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तसेच या महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या बैठकीनंतर वरील प्रश्न सोडविले जातील. ग्रामपंचायतीच्या बैठकीनंतर हे प्रश्न मार्गी लागेल.
- संजय खेडकर (ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत, तळेगाव ढमढेरे)