पुणे: शूरवीरांच्या इतिहासाच्या कर्तृत्वाचा उल्लेख समाजात सर्वत्र केला जातो. पण चित्रपटातून दिग्दर्शकाला दिलेल्या स्वातंत्र्यामुळे हा इतिहास योग्यरित्या दाखवला जात नाही. यापूर्वी शोले, हव्यानव्या अशा चित्रपटातून नाभिक समाजाची बदनामी झाली होती. आता तानाजी सिनेमात दिग्दर्शकाने नाभिक समाजाची बदनामी करणारी ' चुलत्या 'ही व्यक्तिरेखा निर्माण केली आहे. त्यामुळे जय भवानी जय शिवाजी, शिवा काशिदचा विजय असो, तानाजी मालुसरेंचा विजय असो अशा घोषणा देत नाभिक समाजाने टिळक चौकात आंदोलन केले. बारा बलुतेदार समाज विकास, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सकल नाभिक समाजाच्या वतीने तानाजी चित्रपटातील नाभिक समाजाची बदनामी करणारे चुलत्या हे पात्र वगळण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी, शहराध्यक्ष महेश सांगळे, जिल्हा अध्यक्ष निलेश पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती पोकळे, शिवसेनेचे गजानन पंडित, वंचित बहुजन आघाडीचे सैफन गोची, समता परिषदेचे सागर कोल्हे, आणि नाभिक समाज महिला आघाडीआदी उपस्थित होते. याप्रसंगी ५ दिवसात जर हे चित्रण काढले नाही तर भविष्यात उपोषण, व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिला आघाडीने दिला....................................................................................................शोले, हव्यानव्या अशा चित्रपटातून नाभिक समाजाची बदनामी झाली होती. पण समाजबांधवांनी आवाज उठल्यामुळे मध्यंतरी हा विषय थांबला होता. आता पुन्हा चित्रपटातून नाभिक समाजाची बदनामी करणारे प्रदर्शन होऊ लागले आहे. आम्ही तानाजी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तीन दिवस कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही. दिग्दर्शक आणि राजकीय नेत्यांशी चर्चा केली. त्यांना निवेदनही पाठवले. कोणीही दखल न घेता आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. आम्ही त्यामुळेच हे आंदोलन केले आहे.- रामदास सूर्यवंशी...................................................................................................
तानाजी चित्रपटातील 'चुलत्या' हे पात्र वगळा : नाभिक समाजाचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 8:15 PM
यापूर्वी शोले, हव्यानव्या अशा चित्रपटातून नाभिक समाजाची बदनामी झाली होती...
ठळक मुद्देनाभिक समाजाची बदनामी करणारे चुलत्या हे पात्र वगळण्याची मागणी