पारगाव तालुका दौंड येथील सालु-मालु मंदिराचा जीर्णोद्धार अंतिम टप्प्यात आला आहे.
सालु-मालु या देवतांच्या नावावरून पारगावला पारगाव सालु-मालु नाव पडले आहे. नामदेव ताकवणे यांच्या प्रयत्नातून भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून या मंदिरासाठी सभामंडप उभारण्यात आला आहे. सुमारे १० लाख लोकवर्गणीतून या मंदिराचे सुशोभीकरण व फरशीकाम करण्यात आले आहे. गावचे माजी सरपंच सर्जेराव जेधे यांनी स्वखर्चातून एक लाख रुपये खर्चुन मंदिरातील राम, सीता व लक्ष्मण यांच्या मुर्त्या आणल्या आहेत.या मुर्त्या सालु-मालु समाधी शेजारी बसवण्यात येणार आहेत. गावातील बहुतांशी नागरिकांनी लोकवर्गणी दिली आहे. इच्छुकांनी आपापली वर्गणी ऐपतीनुसार जमा करावी अशी मागणी पारगावचे माजी उपसरपंच सुभाष बोत्रे यांनी केली आहे.
१२केडगाव मंदीर
पारगाव येथे सालु मालु मंदिराचे जीर्णोद्धाराचे कामाची पाहणी करताना सुभाष बोत्रे व मान्यवर