खोर : खोर (ता.दौंड) पिंपळाचीवाडी ओढ्यावरील सिमेंट बंधाऱ्यांची दुरवस्था झाली असून या बंधाऱ्यांची पावसाळा सुरू होण्याच्या आधीच दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मागील वर्षी पावसाळ्याच्या कालावधीत खोरच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे खोरचे ओढे तुडुंब भरून वाहू लागले. आणि त्यातच क्षमतेपेक्षा जास्त पाणी झाल्याने पिंपळाचीवाडी येथील सिमेंट बंधारा फुटला गेला. परिणामी, हे जास्तीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे देखील गेल्या वर्षी या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. ओढ्यावरील बंधारा फुटल्याने या बंधाऱ्यामध्ये काहीही पाणी फारसे टिकू शकले नाही. सध्याच्या स्थितीत हा बंधारा पूर्णतः कोरडाठाक आहे. या बंधारा दुरुस्तीबाबतीत पिंपळाचीवाडी येथील ग्रामस्थ विकास चौधरी यांनी खोर ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग, तहसीलदार संजय पाटील, जलसंधारण विभाग, कृषीविभाग या स्तरावर पत्र व्यवहार करून दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मात्र, अजूनपर्यंत या दुरुस्तीच्या बाबतीत काहीही हालचाल होताना दिसत नसल्याचे विकास चौधरी यांनी सांगितले आहे.
सदर पिंपळाचीवाडी येथील सिमेंट बंधाऱ्यावर जवळपास १५० हेक्टर इतकी शेतकरी वर्गाची शेती ही अवलंबून आहे. जर पुढील पावसाळ्याचा हंगाम सुरू होण्याच्या आधीच जर हे बंधारा दुरुस्तीचे काम जर मार्गी लागले गेले, तर पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याची मोठी बचत होऊन पाणी बंधाऱ्यात अडविले जाईल. अन्यथा ऐन पावसाळ्याच्या कालावधीत या नादुरुस्त बंधाऱ्यातून पाणी वाहून गेले तर शेतकरीवर्गाच्या शेतजमिनीला व शेतमालाला याचा मोठा फटका बसणार आहे हे चित्र वास्तविक आहे. त्यामुळे पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी जर अडवायचे असेल तर पावसाळ्या पूर्वीच पिंपळाचीवाडी येथील ओढयावरील सिमेंट बंधााऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
--
चौकट :
आमदार राहुल कुल यांनी दिले बंधारा तत्काळ दुरुस्तीचे आदेश
--
खोर येथील सामाजिक कार्यकर्ते विकास चौधरी, सागर चौधरी, महादेव चौधरी यांनी आमदार राहुल कुल यांची बंधारा दुरुस्तीच्या बाबतीत दि.८ रोजी भेट घेतली असता राहुल कुल यांनी जिल्हा उपअभियंता व दौंडचे उपअभियंता यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली.
---
फोटो क्रमांक : ०८
फोटोओळ : खोर (ता.दौंड) पिंपळाचीवाडी ओढ्यावरील सिमेंट बंधाऱ्यांची दुरवस्था झाली असून या बंधाऱ्यांची पावसाळा सुरू होण्याच्या आधीच दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
(छायाचित्र : रामदास डोंबे)