रांजणगाव सांडस ,राक्षेवाडी, शिंदेवस्ती, आलेगाव पागा आरणगाव या भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी आलेगावपागा-रांजणगाव सांडस हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याचे आठ महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते.मात्र, साइड पट्ट्याचे काम करण्यात आले नाही. तसेच रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे वाढल्यामुळे अपघात घडले आहेत. रस्त्याचे काम पाच वर्षांतून एकदाच होत असते सार्वजनिक बांधकाम विभाग पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करत असतात. परंतु हा रस्ताप्रवासी, नागरिक यांना महत्त्वाचा असल्यामुळे या रस्त्याच्या साईट पट्ट्यावरती दुर्लक्ष करू नये व बांधकामविभाग व ठेकेदार यांनी मुरूम टाकून साईट पट्टी भरून घ्यावी अशी मागणी बापूसाहेब राक्षे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
१२ रांजणगाव सांडस रस्ता
आलेगाव पागा- रांजणगाव सांडस मुख्य रस्त्याच्या साइडपट्ट्याचे काम केलेले दिसत नाही.