पुणे : बीअारटी मार्गातील बसस्टाॅपचे उघडे राहणारे दरवाजे दुरुस्त करण्याचे काम पीएमपीकडून युद्ध पातळीवर करण्यात येत असून लवकरच संगमवाडी ते विश्रांतवाडी अाणि नगरराेड बीअारटी मार्गावरील बसस्टाॅपचे नादुरुस्त दरवाजे दुरुस्त हाेणार अाहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला निर्माण झालेला धाेका टळणार असून त्यांना सुरक्षित प्रवास करता येणार अाहे. बीअारटी बसस्टाॅपचे दरवाजे उघडेच; प्रवाशांचा जीव धाेक्यात या शिर्षकाने लाेकमतने याबाबतचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित केले हाेते. तेव्हा पीएमपीचे सहव्यवस्थापक अजय चारठणकर यांनी काही तांत्रिक कारणांमुळे दुरुस्तीचे काम झाले नसल्याचे सांगितले हाेते. तसेच लवकरच हे काम हाती घेणार असल्याचे अाश्वासनही त्यांनी दिले हाेते. त्यानुसार दुरुस्तीचे काम अाता हाती घेण्यात अाले असून त्याचा अाढावाही घेण्यात येणार अाहे. संगमवाडी ते विश्रांतवाडी अाणि नगरराेड बीअारटी मार्गातील अनेक बसस्टाॅप्सचे काचेचे दरवाजे हे उघडेच ठेवले जायचे. बस ही बसस्टाॅपमध्ये अाल्यानंतर हे दरवाजे उघडणे अपेक्षित अाहे. तसे सेन्साॅरही तेथे लावण्यात अाले अाहेत. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हे दरवाजे बंद पडले हाेते. त्यामुळे ते उघडेच ठेवले जात हाेते. बस अाल्यानंतर प्रवासी कुठली बस अाहे हे पाहण्यासाठी दरवाज्यांच्या बाहेर येत वाकून बघत असल्याने त्यांच्या जीवाला धाेका निर्माण झाला हाेता. तसेच सकाळच्या अाणि संध्याकाळच्यावेळी येथे गर्दी असल्याने बस अाल्यानंतर एखाद्याचा धक्का लागून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. त्यामुळे पीएमपीने याबाबतची दखल घेतली असून हे दरवाजे व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम हाती घेतले अाहे. चारठणकर म्हणाले, सध्या संगमवाडी ते विश्रांतवाडी अाणि नगरराेड बीअारटी मार्गाच्या बस थांब्यांचे काम हाती घेण्यात अाले अाहे. येत्या काही दिवसांमध्ये या दाेन्ही मार्गावरील दरवाजे दुरुस्त करण्यात येणार अाहेत. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरु अाहे. नगरराेडच्या बीअारटी मार्गाचा अाम्ही 15 मेला अाढावा घेणार अाहाेत. या मार्गांवरील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न पीएमपी प्रशासन करत अाहे.
अखेर बीअारटी बसस्टाॅपच्या दरवाजांचे दुरुस्तीचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 4:02 PM
बीअारटी मार्गातील बसस्टाॅपचे उघडे राहणारे दरवाजे दुरुस्त करण्याचे काम पीएमपीकडून हाती घेण्यात अाले अाहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार अाहे.
ठळक मुद्देदरवाजे उघडे राहत असल्याने प्रवाशांच्या जीवाला हाेता धाेकादुरुस्तीचे काम करण्यात येणार युद्धपातळीवर