लासुर्णे : करमाळा येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या काढलेल्या प्रतीकात्मक प्रेतयात्रेचे इंदापुर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणाºया अतुल खुसपे यांच्या प्रतिमेला जोडे मारत इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
येथील इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.शुभम निंबाळकर यांनी आंदोलन केले. राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी हे आंदोलन करीत खुसपे यांचा समाचार घेतला. यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अॅड. शुभम निंबाळकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत निंबाळकर, राष्ट्रवादी सोशल मीडियाचे उपाध्यक्ष करण काटे, काकासाहेब जाधव , दादा यादव, अभि यादव, माऊली काटे, पवन जामदार, अक्षय कदम, परशुराम सावंत, सुमित जगताप, सुरज कदम, धीरज निंबाळकर, सौरभ कदम, सागर गायकवाड, ओंकार पवार, जावेद मुलाणी, अभिजित खुटाले, आकाश जामदार, गणेश मुळीक, अमित मुलाणी उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यातील ३६ हजार एकर जमीन आणि २८ गावांना उजनी धरणाच्या निर्मिती वेळी जलसमाधी मिळाली आहे, त्यामुळे उजनी धरणातील पाण्यावर इंदापूर तालुक्याचा हक्क आहे आणि आमच्या हक्काचे पाणी हे २२ गावांना मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी केले आहे. म्हणून आकसापोटी खालच्या पातळीवर जाऊन कोणी बदनामी करणार असेल तर त्याला भविष्यात यापेक्षा तीव्र उत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया अॅड. शुभम निंबाळकर यांनी लोकमत शी बोलताना दिली.
बेलवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यमंत्री भरणे यांची प्रेतयात्रा काढणाऱ्या करमाळ्यातील खुसपे यांच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करताना राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अॅड. निंबाळकर व पदाधिकारी.
२९०४२०२१-बारामती-०४