बारामती : बारामती नगरपालिकेच्या हद्दीतील डुक्कर पकडण्यात आलेल्या प्रकरणात दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश असताना विलंब केल्याने लिपिक प्रशांत वायसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.बारामती शहरातील मोकाट ५८० डुक्करे पकडण्याचा दावा बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केला होता. मात्र, यावर विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, नगरसेवक विष्णुपंत चौधर यांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली. नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकाºयांनी दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. नगरपालिकेचे लिपिक प्रशांत वायसे यांना या प्रकरणातील अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिले होते. मात्र, त्यांनी अहवाल सादर केला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाºयांना अहवाल पाठवण्यास दिरंगाई झाली. डुक्कर प्रकरणातील बिल काढताना लिपिक म्हणून वायसे यांनी देयके तयार करून सह्या केल्या. त्यानंतर आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांच्या सह्या असल्यामुळे तत्कालीन मुख्याधिकाºयांच्या सहीने बिल काढले होते. वायसे यांनी मुख्याधिकाºयांचे आदेश मानले नाहीत, म्हणून मुख्याधिकाºयांनी निलंबनाची कारवाई केली आहे. निवडणूक काळातील व्हिडीओ चित्रीकरणाच्या बाबतीतदेखील तक्रार केली आहे.‘लोकमत’चे वृत्त सर्वप्रथम...‘लोकमत’ने गैरव्यवहार प्रकरणाचे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. नगरसेवक सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर यांनी त्याचा पाठपुरावा करून जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. त्याचा अहवाल २ दिवसांत मागितला होता. लिपिक प्रशांत वायसे यांनी अहवाल उशिरा सादर केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
बारामती नगरपालिकेच्या हद्दीतील डुक्कर पकडण्याचा अहवाल पडला महागात, लिपिक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 4:28 AM