पुणे : गुलटेकडी भागातील एका दुकानदारावर धारदार शस्त्राने वार करीत ‘तू माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली तर तुला मारून टाकीन,’ असे धमकावून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह तिघांवर स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १९ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० वाजता घडली.
याप्रकरणी एका ४० वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. फिर्यादी हे दुकानात काम करीत होते. त्यावेळी अल्पवयीन मुलाने दहशत पसरवण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्यावर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास मारून टाकण्याची धमकी देत, ‘यहाँ का भाई हू’ असे सांगत हवेत शस्त्र फिरवून तसेच दुचाकीचे नुकसान करत एका रिक्षाची काच फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.