शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

एसटीतील राखीव आसने नियमांच्या जोखडात    

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 7:00 AM

एसटी म्हणते, बसस्थानकातून बस सुटल्यानंतर ‘राखीव’ नाही

ठळक मुद्दे‘एसटी’ बसमध्ये अपंग, महिला, ज्येष्ठ नागरीक, आमदार, खासदार यांच्यासाठी काही आसने राखीव ‘एसटी’नेच असा नियम केलेला असल्याने संबंधित प्रवाशांची कोंडी

पुणे : एसटी महामंडळाच्या बसमधील अपंगांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेली आसने नियमांच्या जोखडात अडकली आहेत. गाडी बसस्थानकात असेपर्यंतच संबंधित आसनांवर अपंग, महिला व इतर आपला हक्क सांगू शकतात. बस सुटण्याच्या ठिकाणी संबंधित आसनांवर इतर प्रवासी बसलेले असल्यास पुढे मार्गात कुठेही त्यांना उठविता येणार नाही, असा अजब नियम एसटीने केलेला आहे. याचा फटका संबंधित घटकांना बसत आहे.

‘एसटी’ बसमध्ये अपंग, महिला, ज्येष्ठ नागरीक, आमदार, खासदार यांच्यासाठी काही आसने राखीव ठेवलेली असतात. आमदार, खासदार वगळता इतर घटक एसटीने नेहमी प्रवास करतात. पण त्यांना अनेकदा या राखीव आसनांचा काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. एखाद्या बसस्थानकावरून बस सुटण्यापुर्वी राखीव आसनांवर इतर प्रवासी बसलेला असल्यास काही वेळ आधी तिथे वाहकांकडून आसने रिकामे करून दिले जाऊ शकते. पण एकदा ही बस मार्गस्थ झाल्यानंतर मधल्या कोणत्याही स्थानकात अपंग, महिला किंवा इतर घटकांना त्यांच्या राखीव आसनांवर हक्क सांगता येत नाही. ‘एसटी’नेच असा नियम केलेला असल्याने संबंधित प्रवाशांची कोंडी झाली आहे. अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाचे अध्यक्ष दिपक ढोबळे यांनाही नुकताच असा अनुभव आला. ढोबळे हे पारगावमध्ये जांबूनतकडून परळ कडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये अपंगांच्या राखीव आसनावर बसले. त्यांना मंचरपर्यंत जायचे होते. पिंपळगाव येथे इतर प्रवासी गाडीमध्ये  बसल्यावर ४ क्रमांकाचे आसनावर आरक्षणाचे तिकीट असल्याचे सांगत त्यांना उठण्यास सांगितले. हे राखीव आसन असल्याने सुरूवातीला त्यांनी उठण्यास नकार दिला. पण एसटीने हे आसन आरक्षित तिकीट दिल्याने उठावे लागले. असा अनुभव संबंधितांना वारंवार येत असल्याची नाराजी ढोबळे यांनी व्यक्त केली. ‘अपंग व्यक्तीला राखीव ठेवलेली आसने इतर लोकांना आरक्षित करून दिली जात असेल आणि अपंग व्यक्तींच्या वाट्याला अन्यायच येत असेल तर अपंग संघाला रस्त्यावर उतरावे लागेल. अपंग किंवा इतर घटकांसाठीची राखीव आसने त्यांना मिळायला हवीत. एसटीने हा नियम बदलण्याची गरज आहे, असे ढोबळे यांनी सांगितले.----------एसटी म्हणते, बसस्थानकातून बस सुटल्यानंतर ‘राखीव’ नाहीएसटी मधील अपंगांसाठी राखीव असलेल्या आसनांचे आरक्षण दिल्यानंतर अपंगांनी कुठे बसायचे. वाहकांच्या म्हणण्यानुसार अपंगांच्या राखीव जागेवर बसण्यासाठी गाडी सुटते त्या स्थानकावरुन बसने गरजेचे आहे. पण एखाद्याला शिरुरवरुन पुण्याला यायचे असेल व गाडी बीड -पुणे असेल तर त्याने बसायला बीडला जायचे का? अपंगांना जिथे बसेल तिथेच राखीव आसनांवर जागा दिली पाहिजे.- हरिदास शिंदे, दिव्यांग चळवळीतील कार्यकर्ते...........जादा गाड्यांना राखीव आसनांचा नियम लागु होत नाही. तसेच इतर गाड्यांमध्ये पहिल्या बसस्थानकातच राखीव आसनांवर संबंधित बसू शकतात. ही गाडी पुढे गेल्यानंतर इतर ठिकाणी राखीव आसनांवर हक्क सांगता येत नाही. या आसनांवर इतर प्रवासी बसलेले असल्यास त्यांना उठविता येत नाही. हा एसटीचा पुर्वीपासूनच नियम आहे. एसटीचा प्रवास लांबपल्याचा असल्याने हा नियम करण्यात आलेला आहे. - यामिनी जोशी, वाहतुक नियंत्रक, पुणे विभागएसटी महामंडळ

टॅग्स :Puneपुणेpassengerप्रवासीTravel Tipsट्रॅव्हल टिप्सDivyangदिव्यांग