बारामती : भिकोबानगर (बारामती) येथील रहिवासी असलेल्या रेश्नव नवनाथ जगताप या अवघ्या चार वर्षांच्या लहानग्याने सलग ९६ तासांच्या स्केटिंग विश्वविक्रमामध्ये सहभाग नोंदवत गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे.
बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आयोजित ३० मे ते ३ जून रोजी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी ९६ तासांचे लार्जेस्ट स्केट मोटो फॉर्मेशन ९६ स्केटिंग करण्याच्या उपक्रम राबविला होता. यामध्ये ४ ते १४ वर्षांपर्यंतच्या वयाचे देशभरातून ४९० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. रेश्नवच्या या कामगिरीसाठी प्रशिक्षक विजय मल्जी (रॉक ऑन व्हील स्कूटिंग अकादमी, पुणे) यांचे मार्गदर्शन मिळाले. अवघ्या चार वर्षांच्या रेश्नवने विश्वविक्रम करून महाराष्ट्राचे नाव संपुर्ण देशात उंचावल्याने समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.