पुण्यात २३ पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समावेश झाला खरा पण आधीच समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील नागरिकांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. त्यामुळे आता या गावांना तरी काही सुविधा मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
पुणे महापालिकेचा हद्दीत काही वर्षांपूर्वी ११ गावे समाविष्ट करण्यात आली. ही गावं शहरात आली तरी जिल्हा परिषदेकडून चालवल्या जाणाऱ्या आरोग्य केंद्रामुळे इथल्या नागरिकांचे हाल होत आहेत. या केंद्रांवर लसिकरणासारखी सुविधा देखील का मिळत नाही असा सवाल नागरिक विचारत आहेत.अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लहान मुलांचे लसीकरण सुरू आहे.त्यासाठी या केंद्रांवर मोठी गर्दी झालेली बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची वानवा तर काही ठिकाणी बंद असलेली केंद्र यामुळे नागरिकांना खासगी दवाखाने किंवा लांब असणाऱ्या केंद्रांवर अवलंबून राहावे लागत आहे. शहर आणि ग्रामीण या वादामध्ये या केंद्रांवर कोरोना लसीकरण देखील केले जात नाहीये.त्यामुळे या केंद्रांचा नक्की उपयोग तरी काय असा सवाल नागरिक विचारत आहेत.
याविषयी ही केंद्र ज्यांचा कडून चालवली जातात त्या जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांना विचारलं असता ते म्हणाले ,"हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कडे मागणी केली असून आता ही केंद्रे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून चालवली जावी अशी असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत"