लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जमीन तुकडेबंदी कायद्यामुळे लोकांना घरे बांधण्यास अडथळे येत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. योजना राबविताना भेडसावणारे अडथळे दूर करण्यासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.विविध योजना राबविताना अनेक अडचणी येत आहेत. ही योजना राबविताना प्रामुख्याने तुकडेबंदी कायद्याच्या अडथळ्याला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांकडे एक गुंठे, दीड गुंठे जागा असतानादेखील त्यांना केवळ तुकडेबंदी असल्यामुळे घर बांधताना अडथळा निर्माण होत आहे. ग्रामीण भागात शेतीचे तुकडे पडू नये, याकरिता तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आला होता. जिल्हा परिषदेकडून घरकुलाच्या योजना राबविताना व गरिबांना घरे देताना तुकडेबंदीचा अडथळा राहू नये, याबाबत जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेत्या आशा बुचके यांनी तुकडेबंदी शिथिलीकरण करण्याबाबतचा ठराव मांडला. राज्य शासनाकडून तुकडेबंदी शिथिल झाल्यास गरिबांना घरकुल बांधण्यासाठी फायदा होणार आहे.
तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा ठराव
By admin | Published: May 13, 2017 4:47 AM