शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

नदी शुद्धतेचा संकल्प, १३ ते १५ एप्रिलला पसायदान संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 4:26 AM

पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनात जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांना पसायदान पुरस्काराने गौरवले जाणार आहे. या वेळी लोकसहभागातून नदी शुद्धीकरणाचा संकल्प हाती घेतला जाणार आहे. हे संमेलन १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी आळंदी येथे फ्रूटवाले धर्मशाळेच्या परिसरात होणार असून, ज्येष्ठ समीक्षक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षपद भूषवणार आहेत.

पुणे - पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनात जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांना पसायदान पुरस्काराने गौरवले जाणार आहे. या वेळी लोकसहभागातून नदी शुद्धीकरणाचा संकल्प हाती घेतला जाणार आहे. हे संमेलन १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी आळंदी येथे फ्रूटवाले धर्मशाळेच्या परिसरात होणार असून, ज्येष्ठ समीक्षक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षपद भूषवणार आहेत.श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पसायदान विचार साहित्य संमेलनात विश्वात्मकता, मानवतावाद, सामाजिक आयाम आदींवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त आणि साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी संस्थानच्या वतीने देहू ते आळंदी लोकसहभागातून जलशुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी नदी शुद्धतेला प्राधान्य दिले जाणार आहे.नदीची स्वच्छता, जलपर्णींची वाढ रोखण्यासाठी प्रयत्न, निर्माल्याची व्यवस्था आदींवर भर दिला जाणार आहे. यासाठी नागरिकांसह वारकरी, स्थानिक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, एनसीएस पथक आदींना या प्रकल्पांमध्ये सामावून घेतले जाणार आहे.‘तरंग’ स्मरणिकेचे प्रकाशनपसायदान विचार साहित्य संमेलनात ‘तरंग’ या स्मरणिकेचे प्रकाशन केले जाणार आहे. सचिन परब आणि अभिजित सोनावणे यांनी या स्मरणिकेचे काम केले असून, यामध्ये पसायदानामागील विश्वकल्याणाची संकल्पना, आताच्या काळातील उपयुक्तता, विश्वात्मकतेची कल्पना आदींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.१ शुक्रवारी, १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता संमेलानध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्यासह खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे, आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे, नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर आदी मान्यवरांच्याउपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. रात्री ९ ते ११ या वेळेत निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडणार आहे. मनोहर जाधव कविसंमेलमनाच्या अध्यक्षस्थानी असतील.२ शनिवारी, १४ एप्रिल रोजी डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत, ‘पसायदानाची वैश्विकता’, ‘माझा धर्म आणि पसायदान’ या विषयांवर चर्चासत्र, सर्वधर्म प्रार्थना, एकांकिका, हरिपाठ, औरंगाबादचे अतिरिक्त विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांचे कीर्तन आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.३ रविवारी, १५ एप्रिल रोजी ‘मला उमगलेले पसायदान’, ‘माझे राजकारण, माझे अध्यात्म’, ‘संतवाणी’ या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी ४.३० वाजता कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार असून, या वेळी डॉ. राजेंद्र सिंह यांना पसायदान पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे