वरवंडमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मीना दिवेकर होत्या. यावेळी उपसरपंच प्रदीप दिवेकर, प्रज्ञा दिवेकर, मंदाकिनी खोमणे, मीरा दिवेकर, मारुती फरगडे, बाळासाहेब जगताप, योगिता दिवेकर, फरजना शेख, अशोक फरगडे, तानाजी दिवेकर, अर्चना रणधीर, योगिनी दिवेकर, मीनाक्षी दिवेकर हे ग्रामपंचायत सदस्य, संजय दिवेकर, मनोहर सातपुते, संदीप दिवेकर, बापू बारवकर, दशरथ दिवेकर, ग्रामसेवक एस. बी. डोळस उपस्थित होते.
ग्रामसभेमध्ये विकास आराखडा तयार करणे, कृषी पर्यटन प्रोत्साहन देणे, जनावरांना मोफत लसीकरण करणे, कुक्कुटपालन, शेळीपालन, कृषिप्रदर्शन, शेततळे यांसदर्भात चर्चा करण्यात आली. दरम्यान, यावेळी भालचंद्र शितोळे यांनी पुणे-वरवंड पीएमपीएल बस सुरू करण्याची मागणी केली. त्यावर चर्चा होत या संदर्भातील ठराव पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
०४ वरवंड
वरवंड येथे सुरू असलेली ग्रामसभा.