शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

नागरिकांच्या तक्रारींचे घरीबसल्या निराकरण

By admin | Published: March 07, 2016 2:07 AM

घरासमोर कचरा साठलाय.. ड्रेनेजलाइन तुंबलीय... पाण्याची पाइपलाइन फुटलीय... रस्ता उखडलाय... अनधिकृत बांधकाम झालंय यासह अनेक छोट्या-छोट्या तक्रारींसाठी वॉर्ड आॅफिस

पुणे : घरासमोर कचरा साठलाय.. ड्रेनेजलाइन तुंबलीय... पाण्याची पाइपलाइन फुटलीय... रस्ता उखडलाय... अनधिकृत बांधकाम झालंय यासह अनेक छोट्या-छोट्या तक्रारींसाठी वॉर्ड आॅफिस, महापालिका येथे चकरा माराव्या लागायच्या. आता नागरिकांना या चकरा मारायची आवश्यकता नसून त्यांनी केवळ घरीबसल्या आॅनलाइन तक्रार नोंदविल्यानंतर महापालिकेचेच कर्मचारी तुमच्या घरी येऊन तक्रारीची सोडवणूक केल्याची माहिती देत आहेत. आतापर्यंत साडेचार हजार तक्रारींचे अशा पद्धतीने निराकरण करण्यात आले आहे.नागरिकांना तक्रार करण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाइन पद्धतीने तक्रार नोंदविता येते. त्याचबरोबर १ जानेवारी २०१५ पासून पालिकेने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर, फेसबुक, गुगल अशा सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच पालिकेने पुणे कनेक्ट नावाचे मोबाइल अ‍ॅप कार्यान्वित केले आहे. यामुळे तक्रार नोंदविणे अत्यंत सोपे झाले आहे. या तक्रारींची सोडवणूक होत आहे की नाही, याचा दररोज आढावा महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून घेतला जात आहे. आॅनलाइन तक्रारींच्या निराकरणाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.चांगला प्रतिसादमहापालिकेकडून १ जानेवारीपासून फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस, गुगल यावरून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तक्रारींचे निराकरण झाल्यानंतर समाधान व्यक्त करणारे फिडबॅक नागरिकांकडून आम्हाला मिळत आहेत. - राहुल जगताप, संगणक विभागप्रमुख, महापालिकाहडपसर भागात अनधिकृतपणे फ्ेलक्स लागले असल्याबाबत मी महापालिकेच्या संकेतस्थळावरून तक्रार नोंदविली होती. त्यानंतर मला माझी तक्रार क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याचबरोबर महापालिकेने त्या फ्लेक्सवर तातडीने कारवाई केली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन माझ्या तक्रारीचे निराकरण झाले असल्याच्या शेरा नोंदवून त्यावर माझी सही घेतली. महापालिकेकडून माझ्या तक्रारीची इतक्या चांगल्या पद्धतीने दखल घेतली गेल्याने मला सुखद धक्का बसला.’’- अनिकेत राठी