मंचर/चाकण : पंधरा दिवसांपूर्वी कांद्याचे बाजारभाव कडाडले होते. जास्त भावामुळे शेतक-यांनी कच्चा कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीस आणल्याने बाजारभाव ढासळले. कमी बाजारभावामुळे कांद्याच्या निर्यातीवरील निर्यातमूल्य कमी करण्याची मागणी झाल्याने शासनाने सकारात्मक निर्णय घेत निर्यातमूल्य कमी केले आहे. त्याचा परिणाम दिसू लागला असून, बाजारभाव १० किलोस शंभर रुपयांनी वाढले आहे.निर्यातमूल्य जास्त असतानाही बाजारभाव कडाडले. कांद्यास १० किलोस सर्वाधिक ४०० रुपये बाजारभाव मिळाल्याने शेतकरी मालामाल झाले. ओल्या कांद्याला वजन असते. शिवाय तो लवकर खराब होत असल्याने शेतकºयांनी शेतातून तो थेट बाजारात विक्रीसाठी आणला. चांगले पैसे मिळत असल्याने वेळेपूर्वीच कांद्याची काढणी सुरू झाली. कच्चा माल विक्रीसाठी येऊ लागला. कांद्याची प्रतवारी ढासळल्याने बाजारभाव कमी झाले. ४०० भाव मिळालेला कांदा १०० रुपयांवर आला व शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला. शेतकºयांनी बाजारभाव वाढण्यासाठी कांद्यावरील निर्यातमूल्य कमी करण्याची मागणी केली. शासनाने या मागणीची दखल घेऊन शुक्रवारी निर्यातमाल कमी केले. त्याचा परिणाम बाजारभावावर होऊन ते पुन्हा वाढले आहे. बाजार समितीत रविवारी कांद्याच्या भावात १० किलोमागे १०० रुपयांनी वाढ झाली. मात्र, निर्यातमूल्य कमी केल्याने निर्यात करण्याचे प्रमाण वाढणार असल्याने बाजारभावचांगले राहतील, अशी माहिती व्यापाºयांनी दिली.>व्यापारी खरेदीसाठी थेट बांधावरराजगुरुनगर : कधी ग्राहकांच्या, तर कधी उत्पादकांच्या डोळ्यातून पाणी आणणाºया कांद्याला चांगला भाव मिळत आहे. शेतकºयांचे कांदापिक खरेदी करण्यासाठी थेट बांधावर व्यापारी जात असल्याचे चित्र खेड तालुक्यात दिसत आहे. खेड तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदापिक घेतात. कांदा बाजारपेठेतला अत्यंत दुर्मिळ पदार्थ ठरला आहे. त्यात समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी व व्यापाºयांना अच्छे दिन, तर ग्राहकांच्या डोळ्यात पाणी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे.कांदा खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकºयांच्या बांधावर जाऊन शेतकºयांशी हितगुज करून कांदा खरेदी करून नेत आहे. त्यामुळे शेतकºयाला बाजारपेठेत कांदा नेण्यासाठी वाहतुकीचा व इतर खर्च वाचत आहे.मागील काही वर्षांपूर्वी शेतकरी कांदाकाढणीनंतर लगेच कांद्याची पात कापून ढीग लावून कांदे शेतात ठेवत असे, तसेच चांगली प्रतवारी करून चांगला बाजार मिळेल, या आशेने कांदे साठवणगृहात ठेवत होते, सध्या कांदा काढणीनंतर लगेच बाजारात नेऊन विक्री करीत आहे. तसेच बांधावर येणाºया व्यापाºयांना विक्री करीत असल्याचे चित्र दिसत आहे.सध्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला २५ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत असून कमी प्रतीच्या कांद्याला २० ते २२ रुपये किलो बाजारभाव मिळत आहे.मागील दोन-तीन वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी अवकाळी पाऊस त्याचा कांदापिकाला फटका आणि योग्य तो भाव न मिळाल्यामुळे तोट्यात होते. त्या वेळी कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपयांचा भाव मिळत होता आणि आता चांगला भाव मिळत असताना शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.>शेतकरी काही प्रमाणात सुखावेलसरकारने शुक्रवार (दि.२) रोजी निर्यातीवरील निर्बंध उठवल्याने निर्यातदारांनी बाजारात खरेदी मोठ्या प्रमाणात केली. पर्यायाने शेतकºयांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. दि. १ फेब्रुवारी रोजी मंचर बाजार समितीत १४,३८३ पिशव्यांची आवक होऊन त्यास १००० ते १८०० क्विंटलला बाजारभाव मिळाला. निर्यातबंदी उठवल्याच्या निर्णयानंतर दि.४रोजी १०५७५ पिशवीची आवक होऊन रु. १००० ते २५१० क्विंटलला बाजारभाव मिळाल्याने शेतकरी काही प्रमाणात सुखावले आहे. भविष्यात कांद्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. शासनाचा निर्णय शेतकºयांच्या फायद्याचा ठरणार आहे.- सचिन बबनराव बोºहाडे, सहायक सचिव,मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीआळेफाटा : काद्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दरात झालेल्या घसरणीला काद्यांचे निर्यातमूल्य कमी केल्याचा आधार मिळाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारातही रविवारी काद्यांच्या दरांनी उसळी घेतल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. पावसाळ्यातील आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांत लागवड झालेल्या कांद्याची डिसेंबर महिन्यात काढणी सुरू झाल्याने आळेफाटा येथीलही उपबाजारात या नवीन काद्यांची आवकेत डिसेंबरच्या दुसºया आठवड्यापासून वाढ होण्यास सुरवात झाली. त्या वेळी चांगले प्रतीच्या कांद्याला प्रति १० किलो ३५० दर होता. तर, आठवडेबाजारांत २० हजार कांदागोणींची सरासरी आवक होत होती.दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या पहिल्या आठवडेबाजारात कांद्याचे हे दर प्रति १० किलो ४००च्या वर गेले व त्यानंतर आळेफाटा येथील मंगळवार, शुक्रवार व रविवारच्या आठवडेबाजारांत आवक वाढत गेली आणि कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली. कांद्याचे निर्यातमूल्य हटवल्याने रविवारच्या आठवडेबाजारात हे दर पुन्हा वाढले व प्रति १0 किलो २५० रुपये दर मिळाल्याने शेतकºयांना आधार मिळाल्याचे चित्र आहे.>निर्यातीबाबत मार्केटमध्ये सातत्यकांदा परिपक्व झाल्याशिवाय तो निर्यात करता येत नाही. शासनाने जरी निर्यात मूल्य हटविले असले तरी त्याचा शेतकºयाला आता फायदा होणार नाही, कारण जागतिक बाजारपेठेत कांदा पाठविण्याची वेळ निघून गेली आहे. उत्पादन जास्त झाले की निर्यातीच्या मागे लागतो. आणि उत्पादन घटले की निर्यात थांबवतो. निर्यात बाबत सातत्य पाहिजे.- चेतन बोत्रे, कांदा उत्पादक शेतकरी, येलवाडी>१५ रुपये मिळाले तरच काहीतरी पदरात पडेलकांद्याला कमीतकमी १५ रुपये किलोला मिळाले तर शेतकºयाच्या पदरात काहीतरी पडेल. खते, औषधे व मजुरीचे दर वाढल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. घाऊक बाजारात जर कांदा २० रुपयाला मिळाला तर किरकोळ बाजारात तो ३० ते ४० रुपयाने विकला जातो. त्यामुळे कांद्याला हमीभाव दिला तर शेतकरी गाळात जाणार नाही. हमीभावामुळे तो उत्पादकाला व खाणारालाही परवडेल.- हिरामण बोत्रे, कांदा उत्पादक शेतकरी, खालुंब्रेनिर्यातमूल्य कमी करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. भांडवल वसूल होऊन त्यांना नफा मिळाला पाहिजे. मात्र, निर्यातमूल्य जास्त असल्याने कांद्याचे भाव कमी होत चालले होते. भविष्यात ते अजून कमी झाले असते. आता बाजारभाव चांगले राहतील, ते कमी होणार नाही. शेतकºयांचा त्यामुळे फायदा होईल.- बाबासाहेब रंगनाथ बाणखेले, व्यापारी, मंचरकांद्याचे बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मागील वर्षीचा अनुभव पाहता यावर्षीसुद्धा कांदा पीक शेतकºयांना अडचणीत आणेल, असे वाटत होते. मात्र, शासनाने निर्यातमूल्य कमी केल्याने संकट टळले. हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे.- सुखदेव शेटे, शेतकरी, वडगाव काशिंबे
कांदा उत्पादकांना मिळाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 1:28 AM