मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद पाबळे होते. या वेळी शिरूर हवेली प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष भाऊसाहेब गव्हाणे, माजी अध्यक्ष विलास खांदवे, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल डॉ. मंजूश्री कुमार, डॉ. दीपक गिरी, डॉ. निखिल हिवरकर, डॉ. स्वाती सानप, डॉ. मंगेश झांबरे, डॉ. शिवाजी नवले, सुहास कंद, हरिभाऊ सरडे, गोरख कापरे, दौलत नवले आदी उपस्थित होते. प्रदीप कंद यांनी सामाजिक बांधिलकी मानून उत्स्फूर्त तीन व्हेंटिलेटरसह सुमारे २२ लाख ५० हजार रुपयांच्या आधुनिक वैद्यकीय यंत्रणेसह मदत म्हणून दिली. या वेळी डॉ. सोनिया काळे, पूनम मासळकर, दिव्या शेंडगे, बापूसाहेब शिंदे, मंगल कुसमाडे, सिंधुताई गव्हाणे यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:09 AM