सकाळी उपस्थितीत या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. हे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र राजगुरुनगर, प्राथमिक उपकेंद्र पिंपरी बु, श्रमसाफल्य प्रसारक मंडळ पिंपरी बु व ग्रामपंचायत पिंपरी बु यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करून यशस्वी करण्यात आली. यावेळी तलाठी व्ही. व्ही. मुंगारे, सरपंच देऊबाई मोहन वाळुंज, प्रा. सोमवंशी, पोलीस पाटील रवींद्र सदाशिव ठाकूर, माजी सरपंच कैलासराव ठाकुर, रखमा वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य धोंडिबा बजाबा वाळुंज, गणेश हुंडारे, सुधा रामदास भुजबळ, आशा दुर्गेश भोसले, ग्रामसेवक शेलार भाऊसाहेब, अशोक बन्सु ठाकुर, बाळासाहेब ठाकुर, द्वारकानाथ ठाकुर, सर्जेराव हुंडारे, शंकर ठाकुर, शांताराम ठाकुर आदी उपस्थित होते.
गावच्या अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थांनी लस घेऊन या लसीकरणाचा शुभारंभ केला. हे लसीकरण यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विकास दादा ठाकुर, श्रमसाफल्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने बाबाजी ठाकुर व पिंपरी उपकेंद्रांच्या वतीने डाॅ रजनी कातोरे व डाॅ योगेश रसाळ यांच्यावर प्रामुख्याने जबाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ पुनम चिखलीकर व डाॅ एस. आर. मोरे यांनी मार्गदर्शन केले.
--
फोटो ओळ:-
पिंपरी बुद्रुक येथे मोफत कोरोना लसीकरण आयोजित करण्यात आले होते.